ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते बारीक करा.
त्यात थोडे दही घालून पेस्ट बनवा आणि ती टाळूवर लावा.
३० मिनिटांनी सौम्य हाताने केस धुवा. केस मजबूत होतील.
मेथी केसांच्या मुळांना पोषण देते आणि केस गळणे कमी करते.
दही टाळूला हायड्रेट करते आणि कोरडेपणा दूर करते.
आठवड्यातून एकदा हा मास्क लावल्याने तुमच्या केसांमध्ये फरक दिसून येईल.
यामुळे केस मऊ, चमकदार आणि जाड दिसतील.