Vaibhav Suryavanshi: Saam Tv
Sports

Vaibhav Suryavanshi: IPL मध्ये वैभवची तडाखेबाज फलंदाजी, वैभवच्या खेळीची क्रिकेटच्या देवाला भूरळ

IPL Match Update: वैभव सूर्यवंशीने 29 चेंडूत 97 धावांची खेळी केली. 15 व्या वर्षी त्याने अनेक मोठे IPL विक्रम मोडले. सचिन तेंडुलकरने वैभवच्या फलंदाजीचे कौतुक केले.

Priya More
  • वैभव सूर्यवंशीचा आयपीएलमध्ये विक्रम

  • १५ वर्षीय क्रिकेटपटूची तुफानी खेळी

  • सचिन तेंडुलकरने केलं वैभवचं कौतुक

  • आयपीएलमधील सर्वात युवा स्टार

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात वैभव सूर्यवंशीनं आपल्या खेळीनं सर्वांनाच चकित केलंय. या चमकदार कामगिरीनंतर वैभवची पुढील काळात भारतीय क्रिकेट संघात वर्णी लागणार का? पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट...

आयपीएलचा यंदाचा मोसम शेवटाकडे आला असताना चर्चा रंगलीये ती राजस्थान रॉयल्सचा डावखुरा फलंदाज वैभव सुर्यवंशी याची... आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात वैभवनं हैदराबादविरुद्ध 97 धावांची झंझावाती खेळी केलीये. त्यानं क्रिकेट विश्वातील दिग्गजांचे विक्रम कसे मोडीत काढलेत पाहूयात...

अवघ्या 29 चेंडूंमध्ये 97 धावांची झंझावाती खेळी

600हून धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू (वय 15 वर्षे), ऋषभ पंतचा (20 वर्षे) विक्रम मोडला.

IPLमध्ये पाचव्यांदा 20 पेक्षा कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम वैभवनं केलाय.

ख्रिस गेलचे 59 सिक्सचा विक्रम मागे टाकून एका हंगामात सर्वाधिक 65 सिक्स

एका हंगामात अनकॅप्ड फलंदाज म्हणून सर्वाधिक 680 धावा, यशस्वी जैस्वालचा विक्रम मोडला

300हून अधिकच्या स्ट्राईक रेटनं सर्वाधिक 3 वेळा 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा जागतिक विक्रम

विशेष म्हणजे, वैभव आजवरच्या सर्वात वेगवान शतकाला गवसणी घालणार होता. मात्र, त्याआधीच तो बाद झाला. माझ्या डोक्यात हा बाद फेरीचा मोठा सामना असल्याचा विचार होता. जेव्हा मी आऊट झालो, तेव्हा मला सर्वात वेगवान शतकाच्या रेकॉर्डबद्दल समजलं. मी सरळ शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच चूक झाली. वैयक्तिक रेकॉर्डपेक्षा माझ्यासाठी संघाला आयपीएल ट्रॉफी जिंकून देणं जास्त महत्त्वाचं आहे.

15 वर्षीय वैभवच्या खेळीनं क्रिकेटमधील दिग्गजांना भूरळ पाडलीये. वैभवच्या वादळी खेळीनं क्रिकेटच्या देवालाही थक्क केलंय. सचिननं वैभवच्या फलंदाजीचं तांत्रिक गणित सांगत त्याचं कौतुक केलंय. वैभव सूर्यवंशीचा बॅट स्विंग कमालीचा आहे. त्याहूनही खास गोष्ट म्हणजे, लेग साइडला येणाऱ्या चेंडूंवर तो ज्या पद्धतीनं फ्रंट फुट बाजूला काढून स्वतःसाठी जागा तयार करतो, ते पाहण्यासारखं आहे. त्यामुळे त्याला स्वतःचा नैसर्गिक खेळ खेळण्याचं स्वातंत्र्य मिळतं. त्याची ही खेळी खरोखरच थक्क करणारी होती.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजवर अनेक खेळाडूंनी आपल्या कौशल्यानं देश-विदेशातील मैदानं गाजवलीयेत. अशातच आता वैभवच्या रुपानं आणखी एक उमदा खेळाडू भारतीय क्रिकेट विश्वाला गवसलाय. त्यामुळे पुढील काळात वैभवसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कवाडे खुली होणार का? आणि आपल्या खेळीनं जागतिक पातळीवर ठसा उमटवणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमधील गराडे धरण 100 टक्के भरले

Thursday Horoscope: नात्यात गोडवा वाढेल; ५ राशींच्या व्यक्तींनी खर्च जपून करा; वाचा आजचे राशीभविष्य

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन', मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईत तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! उंदीर आणि माशांचा वावर दिसताच प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द

Motichoor Laddu Recipe: सण किंवा कार्यक्रमासाठी, घरच्या घरी बनवा हलवाईसारखे मऊ, रसाळ आणि स्वादिष्ट मोतीचूर लाडू

SCROLL FOR NEXT