

वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी आणि जोफ्रा आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदरबादच्या संघाने गुडघे टेकले. एलिमिनेटर सामन्यात राजस्था रॉयल्सनं सनरायझर्स हैदराबादचा ४७ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर हैदराबाद संघाचा आयपीएलमधून बाहेर पडला आहे. तर राजस्थान रॉयल्स आता २९ मे रोजी मुल्लानपूर येथे क्वालिफायर २ मध्ये गुजरात टायटन्सशी भिडणार आहे.
गुजरातचा रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून पराभव झाला आहे. क्वालिफायर २ जिंकणारा संघ ३१ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरशी दोन हात करणार आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने ८ गडी गमावत २४३ धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली. अख्खा संघ १९६ धावांवर गारद झाला.
दरम्यान राजस्थानच्या या विजयाची मानकरी ठरले वैभव सुर्यवंशी, ध्रुव जुरेल, जाफ्रा आर्चर. वैभवने विक्रमी खेळी केली, जुरेलने अर्धशतक झळकावले, तर आर्चरने गोलंदाजी करताना आपल्या तीन महत्त्वपूर्ण बळी घेऊन हैदराबादचे कंबरडे मोडले. आर्चरने सलामीवीर अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड आणि इशान किशन यांना बाद करून राजस्थानच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.
राजस्थान रॉयल्सने दिलेल्या २४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा संघ १९.२ षटकांत केवळ १९६ धावाच करू शकला. हैदराबादची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा खाते न उघडता जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर ट्रॅव्हिस हेडही मोठी खेळी करू शकला नाही. त्याने ८ चेंडूंमध्ये २ चौकार आणि १ षटकार लगावत केवळ १७ धावा केल्या. हेडलाही जोफ्रा आर्चरनं बाद केलं.
त्यानंतर यष्टीरक्षक इशान किशनने तीन चौकार आणि तीन षटकारांसह ११ चेंडूंमध्ये ३३ धावांची वेगवान खेळी केली, पण तोही आर्चरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. डोनोवन फरेराने त्याचा झेल टिपला. अशाप्रकारे, जोफ्रा आर्चरने पहिल्या तीन मोठ्या विकेट्स घेतल्या. नांद्रे बर्गर आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. जोफ्रा आर्चरने पहिले तीन महत्त्वाचे बळी घेतले. त्यानंतर नांद्रे बर्गर आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.