6,6,6... वैभव सूर्यवंशीचं वादळ! 15 वर्षांच्या पोराने दिग्गज गोलंदाजांना फोडलं, शतक थोडक्यात हुकलं

Vaibhav suryavanshi batting : वैभव सूर्यवंशी हैदराबादविरोधात चांगलीच फटकेबाजी केली आहे. वैभवचं अवघ्या ३ धावांनी शतक हुकलं.
vaibhav sooryavanshi batting
vaibhav sooryavanshi centurySaam tv
Published On
Summary

वैभव सूर्यवंशी पुन्हा चमकला

अवघ्या १५ वर्षांच्या पोराची मैदानात जोरदार फलंदाजी

वैभवने २९ चेंडूत कुटल्या ९७ धावा, चाहत्यांकडून कौतुक

आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने हैदराबादविरोधात वादळी खेळी खेळली आहे. १५ वर्षांच्या पोराने हैदराबादच्या दिग्गज गोलंदाजांना फोडलं आहे. त्याने २९ चेंडूत ९७ धावा कुटल्या. त्याचं अवघ्या ३ धावांनी शतक हुकलं. आक्रमक खेळी खेळत ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे.

आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना होत आहे. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जायस्वाल मैदानात उतरले.

vaibhav sooryavanshi batting
RCB vs GT: रजत पाटीदारचा षटकार पाहून भारावला विराट कोहलीही; एकटक पाहतच राहिला! व्हिडिओ व्हायरल

वैभवने सुरुवातीलाच हैदराबादच्या विरोधात आक्रमक खेळी खेळण्यास सुरुवात केली. त्याने सामन्याच्या चौथ्या षटकात १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतक पूर्ण करताना १ चौकार आणि ८ षटकार लगावले. आक्रमक फलंदाजी करताना ख्रिस गेलचा विक्रम मोडला.

पहिलं षटक करणाऱ्या पॅट कमिन्सच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूत जोरदार षटक लगावला. त्यानंतर दुसऱ्या षटकात ईशान मलिंगाला देखील एक षटकार लगावला. तर तिसऱ्या षटकात कमिन्सच्या चेंडूवर तिसरा षटकार लगावला. पुढे चौथे षटक साकिब हुसैनने टाकले. त्याने चौथ्या षटकात ३ षटकार लगावले. वैभवने चौथ्या षटकात अर्धशतक पूर्ण केलं.

वैभव सूर्यवंशी आयपीएल सीझनमध्ये ६०० धावा पूर्ण करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. याआधी विक्रम हा ऋषभ पंतच्या नावावर होता. पंतने २०१८ साली विक्रम केला होता. या सामन्यात वैभव सूर्यवंशीचं शतक थोडक्यात हुकलं. त्याने २९ चेंडूत ९७ धावा कुटल्या. त्याने या डावात १२ षटकार आणि ५ चौकार लगावले.

vaibhav sooryavanshi batting
RCB vs GT: RCB नं पाचव्यांदा अंतिम फेरीत मारली धडक; क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा धुव्वा

आयपीएलमध्ये कोणी किती षटकार लगावले?

वैभव सूर्यवंशी: 65 षटकार (2026)

क्रिस गेल: 59 षटकार (2012)

आंद्रे रसेल: 52 षटकार (2019)

अभिषेक शर्मा: 43 षटकार (2024)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com