

आता बातमी आहे मेंढरांनी मिळवून दिलेल्या थार गाडीची....सांगलीतल्या दाजी थोरातांना मेंढरांचा नाद. गावच्या जत्रेत मेंढरं नेली आणि रुबाबदार मेंढरांनी थेट घरी थार गाडी आणून दिली.आता तुम्ही म्हणाल मेंढरं विकून गाडी घेतली असेल.मुळीच नाही. थारसोबत मेंढरंही घरी आली.नेमकं काय झालं ? त्याचाच हा रिपोर्ट.
गुलालाचा धुरळा अन् धुराच्या कांड्या. त्यात गाडीच्या बोनेटवर हातात फायर गण घिवून उभा असलेलं ही हायत दाजी थोरात. दाजीबाची कापडं पार गुलालानं भरल्यात. दाजीबा कुठली निवडणूक जिकलं नाहीत तर जिकलं हाईत गाडी थार. ती बी त्यांच्या माडग्याळ मेंढ्यामुळं..या जल्लोषाचं मानकरी खरं तर ही देखण्या मेंढ्या हाईत.अन् दुसरीकडं ही हाईत सोमनाथ जाधव. यांचा बकरा ठरलाय हिंदकेसरी. सोन्या सारख्या बकऱ्यानं सोमनाथला मिळवून दिलीय सोन्याची चैन तीबी तोळाभराची. वाघाच्या गळ्यात चैनबसना म्हणून ट्राफिलाच घातलीय. नियोजन एकमदच शॉलेड.
त्याचं झालं असं आटपाडीचं ग्रामदैवत उत्तरेश्वर कार्तिकी यात्रेनिमित्त जातीवंत मेंढ्यांचे प्रदर्शन भरवलं जातंय. सांगोला, आटपाडी अन् अजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या मेंढपाळांचा यात टच्च सहभाग असतू. अन् यातून पहिला नंबर पटकला दाजीबाच्या मेंढारांनी अन् दुसरा नंबर सोमाच्या मेंढरांनी त्योबी एकदम दर्जा.
असो शेवटी दुष्काळात माझ्या मेंढपाळांचे कौतुक होतंय ही भारीय हाय. असो हा तेवढा दुष्काळ संपो अन् पुढ्याबारीनं थार ऐवजी मर्सडिज मिळो
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.