Vaibhav Suryavanshi: ठरलं तर मग...! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी लवकरच टीम इंडियात खेळणार

Vaibhav Suryavanshi Team India Debut: क्रिकेटच्या जगात सध्या चर्चेत असलेला १५ वर्षांचा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी लवकरच टीम इंडियात पदार्पण करू शकतो. बीसीसीआयच्या निवड समितीनं या धुरंधर फलंदाजाचं नाव आगामी दौऱ्यासाठी शॉर्टलिस्ट केल्याचे वृत्त आहे.
वैभव सूर्यवंशी टीम इंडियात खेळणार
vaibhav suryavanshi/social mediasaam tv
Published On

भारतीय क्रिकेटचा उगवता तारा, अंडर १९ वर्ल्डकप, यूथ क्रिकेट, आयपीएल स्पर्धेत बॅटमधून धावांचा पाऊस पाडणारा अवघ्या १५ वर्षांचा धुरंधर फलंदाज आणि राजस्थान रॉयल्सकडून सलामीला येऊन गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करणारा वैभव सूर्यवंशी लवकरच टीम इंडियाच्या निळ्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टनुसार, निवड समितीनं आयर्लंड दौऱ्यासाठी ज्या खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट केलेली आहेत, त्यात वैभव सूर्यवंशीचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे.

आयपीएल २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशी हे नाव सर्वात चर्चेत आहे. जगातला कुठलाही गोलंदाज असो त्याने फेकलेला चेंडू सीमापार तडकावायचाच, असा चंग त्यानं बांधलेला दिसतो. बुमराहसारख्या गोलंदाजाला एकाच ओव्हरमध्ये दोन षटकार खेचणाऱ्या वैभवच्या बॅटमधून आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पडताना दिसत आहे. त्यामुळेच वैभव सूर्यवंशीला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी द्या, अशी मागणी सोशल मीडियावर आणि क्रिकेटमधील तज्ज्ञांकडून होत आहे. आता हाच वैभव लवकरच टीम इंडियात खेळताना दिसू शकतो.

आयर्लंडच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या चमूत वैभव सूर्यवंशीचं नाव शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. वैभवने १५ व्या वर्षी टीम इंडियासाठी पदार्पण केलं तर, तो भारतीय इतिहासातील एक सोनेरी क्षण ठरणार आहे. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरणार आहे.

वैभव सूर्यवंशी टीम इंडियात खेळणार
शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

आयर्लंड दौऱ्यात मिळू शकते संधी?

भारतीय संघ जून २०२६ मध्ये इंग्लंडच्या अत्यंत महत्वाच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी भारत आयर्लंडविरुद्ध दोन सामन्यांची टी २० मालिका खेळणार आहे. रिपोर्टनुसार, निवड समिती या इंग्लंड दौऱ्याआधी काही नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकते. त्यात सर्वात आघाडीवर वैभव सूर्यवंशीचं नाव असल्याचे कळते. आयर्लंड दौऱ्यावर पहिला टी २० सामना २६ जून रोजी होणार आहे. तर दुसरा टी २० सामना हा २८ जून २०२६ रोजी होणार आहे.

वैभव सूर्यवंशी टीम इंडियात खेळणार
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला अटक करा, अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मैदानात काय घडलं?

वैभव रचणार इतिहास

टीम इंडियासाठी अवघ्या १५ व्या वर्षात शॉर्टलिस्ट होणे ही वैभवसाठी मोठी गोष्ट आहे. अंडर १९ वर्ल्डकप, यूथ क्रिकेटपासून आयपीएलपर्यंत त्यानं फलंदाजीनं सगळ्यांनाच प्रभावित केलं आहे. वय कमी असलं तरी भल्याभल्या गोलंदाजांच्या आपण चिंधड्या उडवू शकतो हे त्यानं आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळताना दाखवून दिलं आहे. अशावेळी आयर्लंड दौऱ्यात त्याची टीम इंडियात निवड झाली आणि त्याचं पदार्पण झालं तर, त्याच्या कारकिर्दीतील मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. वैभवने पदार्पण केलं तर, सचिनचा विक्रम तो मोडू शकतो. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचं वय ६ वर्षे २०५ दिवस असताना त्याने टीम इंडियासाठी पदार्पण केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com