शिक्षकांचा ऑनलाईन कामांवर टाकणार बहिष्कार; प्रशासकीय कामांविरोधात शिक्षक संघटना आक्रमक

Maharashtra Teachers Warn Statewide Agitation: महाराष्ट्रातील शिक्षक अध्यापनाव्यतिरिक्त इतर जबाबदाऱ्यांतून मुक्ततेची मागणी करत आहेत. शिक्षक संघटना प्रशासकीय कामाच्या ओझ्याला विरोध का करत आहेत.
Maharashtra Teachers Protest Against Administrative Workload | Teachers Demands
Maharashtra Teachers Protest Against Administrative Workload | Teachers Demandssaam tv
Published On: 
Summary
  • शिक्षकांनी अतिरिक्त प्रशासकीय कामांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

  • अध्यापनाव्यतिरिक्त कामांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होतंय.

  • अतिरिक्त कामांचा भार कमी करण्याची शिक्षकांची मागणी.

आता बातमी आहे शिक्षकांच्या एल्गाराची, राज्यातील शिक्षकांनी प्रशासकीय कामांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. शिक्षकांनी विविध संघटनांसमोर तक्रारींचा पाढा वाचलाय. तर तोडगा न काढल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय. काय आहेत शिक्षकांच्या मागण्या? पाहूयात या रिपोर्टमधून.

राज्यातील शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्या व्यतिरिक्त इतर कामांचाही भार वाहावा लागतोय.. निवडणुकांच काम,जनगणना आणि वेळोवेळी येणारं प्रशासकीय काम..या सगळया कामाच्या भारानं शिक्षक हैराण झाले आहेत. या अतिरिक्त कामांच्या ओझ्याखाली विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप करत शिक्षक संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय. 1 डिसेंबरपासून अध्यापनाव्यतिरिक्त सर्व ऑनलाइन कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षकांनी घेतलाय. एव्हंढच नव्हे तर मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार

Maharashtra Teachers Protest Against Administrative Workload | Teachers Demands
गडचिरोलीत शिक्षक म्हणून कार्यरत दाम्पत्याचा नागपुरात मृत्यू; घरात आढळले मृतदेह

शिक्षकांच्या तक्रारी काय?

अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शिकवण्यावर गंभीर परिणाम होतो

अहोरात्र येणाऱ्या WhatsApp मेसेजमुळे प्रचंड मानसिक त्रास

ऑनलाइन माहिती गोळा करण्याचं आणि उपक्रमांचं ओझं शिक्षकांवर लादलं जात आहे.

Maharashtra Teachers Protest Against Administrative Workload | Teachers Demands
Maharashtra Farmer: पोट भरण्यासाठी शेतकरी APMC बाजारात, दुष्काळग्रस्तांचे हाल, बळीराजा झाला हमाल

महत्त्वाचं म्हणजे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत, असं सरकारचं धोरण असतानाही अनेक जिल्ह्यांत विविध कामं शिक्षकांनाच सोपवली जात आहेत. त्यातच शाळांमधील स्वयंसेवी संस्थांचा वाढता हस्तक्षेपही शिक्षकांसाठी अडचणीचा ठरत असल्याचं समोर आलंय. दुसरीकडे, ऑनलाइन कामांवर बहिष्कार टाकण्याच्या शिक्षकांच्या निर्णयामुळे प्रशासकीय यंत्रणेसमोर पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बहिष्काराचा निर्णय घेतल्यानंतर तरी शिक्षकांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघणार का?... हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.