India Pakistan Tension IPL 2025 X
Sports

भारत-पाकिस्तान तणावामुळे IPL 2025 ला स्थगिती, पण तिकीटाचं काय? कसं मिळवाल रिफंड? जाणून घ्या...

India Pakistan Tension IPL 2025 : पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध ताणले गेले. देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगिती देण्यात आली आहे.

Yash Shirke

भारत-पाकिस्तान तणाव वाढल्याचा परिणाम क्रिकेट विश्वावर झाला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे बीसीसीआयने आयपीएल २०२५ लीग एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्याभरात चर्चा केल्यानंतर पुढे काय होणार हे बीसीसीआयद्वारे ठरवले जाईल. आयपीएलचे सामने रद्द झाल्यानंतर अनेकांच्या मनात तिकाटांबद्दलचा विचार आला आहे. आयपीएल स्थगित झाल्यानंतर सामन्यांच्या तिकीटाचे पैसे परत कसे मिळवायचे चला जाणून घेऊयात...

आयपीएल २०२५ ला एका आठवड्याची स्थगिती मिळाल्याने चर्चा केल्यानंतर बीसीसीआय पुढील निर्णय घेणार आहे. सामन्यांची वेळ, तारीख आणि जागा बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्या सामन्यांच्या तिकीटांची विक्री झाली आहे, त्या तिकीटांचं काय? तर आयपीएलच्या नियमांनुसार, एखादा सामना रद्द झाल्यास किंवा पुढे गेल्यास रिफंड दिला जातो. जर सामन्यादरम्यान पाऊस पडला किंवा सुरक्षेच्या कारणास्तव सामना थांबवण्यात आला, तर तिकीटांचे पैसे परत केले जात नाहीत. आता आयपीएल स्थगित झाल्याने ज्यांनी-ज्यांनी आगामी सामन्यांची तिकीटे बुक केली आहेत, त्यांना रिफंड मिळेल असे म्हटले जात आहे.

जर तुम्ही आयपीएलच्या सामन्यांची ऑनलाइन तिकीट बुक केली असतील, तर सामने रद्द झाल्यास तुम्हाला आपोआप पैसे परत मिळतील. जर तुम्हाला रिफंड मिळाला नाही, तर तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवरुन तिकीट बुक केले आहे, त्यावर जाऊन रिफंड मागू शकतो. यासाठी तुम्हाला तिकीट आणि ओळखपत्र अपलोड करावे लागेल. रिफंडसाठी तुमच्या बँक खात्याबद्दलची माहिती देखील द्यावी लागू शकते. जर तुम्ही स्टेडियममधून तिकीट खरेदी केले असेल, तर तेथील काउंटरवर जाऊन तिकीट आणि ओळखपत्र दाखवून रिफंड मागू शकता.

हिमाचल प्रदेशमधील धरमशाला येथे पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना मध्येच थांबवण्यात आला होता. ८ मे रोजी पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर आज ९ मे रोजी आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

Ginger Garlic Paste: मीठ आणि तेल वापरून बनवा आलं- लसूणाची पेस्ट, दिर्घकाळ टिकेल

SCROLL FOR NEXT