मुंबईकरांनो...! रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक

Mumbai Mega Block News : अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी ११ मे रोजी, रविवारी मध्य आणि हार्बर या दोन रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकमुळे रेल्वे वेळापत्रकात कसे बदल असतील? जाणून घ्या...
Mumbai Mega Block News
Mumbai Mega Block NewsSaam Tv
Published On

रेल्वेची विविध आभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांमध्ये रविवार ११ मे रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत आणि कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी १०.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील.

Mumbai Mega Block News
Operation Sindoor : ५ पाकड्यांना संपवलं, शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला; घाटकोपरचे मुरली नाईक शहीद

ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या सेवा मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार थांबतील व माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

Mumbai Mega Block News
IPL 2025 मध्येच थांबवल्यास कोण होणार चॅम्पियन? RCB चं १८ वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल का?

कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी १०.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४८ ते सायंकाळी ४.०८ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते सायंकाळी ४.१० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

Mumbai Mega Block News
Dawood Ibrahim : भारताचं ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानात; बिळात लपलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद भेकडासारखा पळाला

तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कुर्ला- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व पनवेल- वाशी -पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. पायाभूत सुविधांच्या देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर असून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती आहे.

Mumbai Mega Block News
घाबरून, गोंधळून जाऊ नका! देशात पुरेसा पेट्रोल-डीझेल साठा; पंपांवरील गर्दीनंतर इंडियन ऑइलचं स्पष्टीकरण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com