Sakshi Sunil Jadhav
माणसाला एकवेळ अन्न वेळेवर मिळालं नाही तरी चालतं. पण पाणी हवंच असतं.
पाणी हेच आपले जीवन असतं. त्यात वाढत्या उन्हाळामुळे आता तहान लागण्याचं प्रमाणही वाढत चाललं आहे.
पाणी प्यायल्याने आपलं डिहायड्रेशनपासून संरक्षण होतं. तसेच शरीराचं तापमानसुद्धा नियंत्रित राहतं.
तुम्ही जर उन्हाळा जबरदस्ती पाणी पित राहत असाल तर तुम्हाला भविष्यात काही गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्यामुळे शरीरातले सोडियमचे प्रमाण कमी होत जाते. यालाच ‘ओव्हरहायड्रेशन’ म्हणतात, त्यामुळे शरीराचं संतुलन बिघडू शकतं.
जास्त पाणी प्यायल्याने डोकेदुखी, मळमळ, उलटी, थकवा आणि गंभीर प्रकरणात मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असते.
साधारणपणे दिवसाला २.५ ते ३ लिटर पाणी पुरेसं मानलं जातं. व्यक्तीच्या कामाच्या स्वरूपानुसार आणि घामाच्या प्रमाणानुसार हे बदलू शकतं.
तहान नसताना सतत पाणी पिणं टाळावं. शरीराची गरज ओळखूनच पाणी प्यावं, अन्यथा त्रास होऊ शकतो.
हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी असून साम टिव्ही याच्याशी कुठलेही समर्थन करत नाही.