Sakshi Sunil Jadhav
सध्या जिओचे ग्राहक वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यातच रिलायन्स जिओ त्यांच्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन ऑफर्स देत असतं.
मुळात स्मार्ट फोन हा माणसाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक झाल्यामुळे त्याचा वापर रोजच्या रोज केला जातो.
एखादा मोबाईल असेल तर त्यामध्ये सीम कार्ड आवश्यक असतं. पण जर तुम्हाला एखाद्या सीमचा जास्त वापर करायचा नसेल आणि ते अॅक्टीव्ह ठेवायचं असेल तर हा प्लान वाचाच.
नुकताच जिओने एक भन्नाट स्वस्त आणि आपल्या कामासाठी खूप महत्वाचा ठरेल असा महत्वाचा प्लान आणला आहे.
जिओ कंपनीने हा प्लान त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर सुद्धा दिलेला आहे. पुढे याबद्दल जाणून घेऊयात.
Jioच्या परवडणाऱ्या रिचार्ज प्लानची किंमत १८९ रुपयांची असणार आहे. यामध्ये कोणत्याही जास्त शुल्काची गरज नाही.
तुम्हाला यामध्ये अनलिमिडेट कॉलिंग सुविधा असणार आहे. त्यामुळे हा प्लान खूप फायद्याचा ठरेल.
तसेच तुम्हाला यामध्ये एकूण ३०० एसएमएसची सुविधा मिळणार आहे. तसेच यामध्ये एकूण २ जीबी डेटा सुद्धा मिळणार आहे.
Jioच्या या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला जिओ टिव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउड सुद्धा मिळणार आहे.
Jioचा हा रिचार्ज प्लान एकूण २८ दिवसांचा असणार आहे. म्हणजेच तुम्ही महिनाभर या प्लानचा वापर करू शकता.