परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे निलंबित; प्रशासनाकडून मोठी कारवाई, धक्कादायक कारण समोर

beed news : परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना निलंबित करण्यात आलंय. प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आलीये.
beed
beed newsSaam tv
Published On
Summary

परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे अखेर निलंबित.

भ्रष्टाचार प्रकरणात मोठी कारवाई

विभागीय आयुक्त यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडच्या परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर शासनाकडून मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आलीये. त्यांना थेट निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या अंतर्गत अटक झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आलं आहे. लाचखोरी प्रकरणात गुन्ह्यात अटक झाल्यानंतर न्यायालयाने मुंडे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता त्यांना बीड जिल्हा कारागृहात हलविण्यात आलंय.

beed
नगरमध्ये खळबळ! घायवळला कानफटात लगावणाऱ्या कुख्यात गुंडाचा गोळीबारात मृत्यू

नियमांनुसार, एखादा लोकसेवक ४८ तासांपेक्षा अधिक काळ न्यायालयीन अभिरक्षेत राहिलं, तर त्या व्यक्तीवर निलंबनाची कारवाई करण्यात येते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी अटकेच्या दिवसापासून म्हणजेच २० फेब्रुवारीपासून व्यंकटेश मुंडे यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केलेत. या कारवाईमुळे परळीतील महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची जिल्हाभरात चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

काही दिवसांपूर्वी बीडच्या परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाचलुचपत पथकाने ताब्यात घेतले होते. मुंडे यांच्या विरोधात तक्रारदाराने सोलंसी प्रमाणपत्रासाठी ५० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर लाचलुचपत पथकाने सापळा रचला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्ट्मपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली होती. तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीनंतर २० हजार रुपयांवर सौदा ठरला होता. या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत पथकाकडे पोहोचली. त्यानंतर सापळा रचून कारवाई केली.

beed
Train Viral Video: वर्दीला सलाम! रेल्वे जवानांनी धक्का देत चक्क बंद ट्रेन केली सुरू; VIDEO पाहून चक्रावून जाल

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केली होती. परंतु एसीबीने आवश्यक पुरावे जमा करत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली होती. या कारवाईमुळे परळी तालुक्यातील महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com