MS Dhoni  X (Twitter)
Sports

MS Dhoni : आयपीएलमध्ये 'इम्पॅक्ट प्लेयर्स' असावेत की नाही? धोनीने स्पष्टच सांगितलं, धक्कादायक कारण देत म्हणाला...

Mahendra Singh Dhoni : एमएस धोनीने आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेयर रुलवर प्रतिक्रिया दिली आहे. जिओहॉटस्टारवर The MSD Inspiration या कार्यक्रमाला महेंद्रसिंह धोनी उपस्थित होता. तेव्हा त्याने नियमावर भाष्य केले.

Yash Shirke

MS Dhoni IPL 2025 : आयपीएलमध्ये ५ ट्रॉफी जिंकणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने इम्पॅक्ट प्लेयर रुलवर आपले मत नोंदवले आहे. २०२३ मध्ये इन्पॅक्ट प्लेयरचा नियम लागू करण्यात आला. तेव्हापासून हा नियम वादाच्या भोवऱ्यात आहे. या नियमामुळे सामन्यात जास्त धावसंख्या होत असल्याचे अनेकांचे मत आहे. या एकूण प्रकरणावर माहीने आपली बाजू मांडली आहे.

जिओहॉटस्टारवर The MSD Inspiration या कार्यक्रमामध्ये एमएस धोनी म्हणाला, 'ज्या वेळेस इम्पॅक्ट प्लेयरचा नियम लागू करण्यात आला, तेव्हा त्याची गरज नव्हती असा विचार माझ्या मनात आला होता. मी अजूनही विकेटकीपिंगच करतो, त्यामुळे मी इन्पॅक्ट प्लेयर नाहीये. मला क्षेत्ररक्षणासाठी मैदानात यावंच लागतं.'

इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे आयपीएलमध्ये मोठी धावसंख्या होत आहे, असा बऱ्याच लोकांचा समज आहे. खेळाडूंचे रिलॅक्स माइंडसेट आणि मैदानातील परिस्थिती यामुळे मोठी धावसंख्या करणे शक्य होत आहे, असे मला वाटते. एक अतिरिक्त खेळाडूमुळे इतक्या धावा करत नाहीये, असे महेंद्रसिंह धोनी म्हणाला आहे.

ही एक मानसिकता आहे. आपल्याकडे एक अतिरिक्त फलंदाज आहे, यामुळे संघ टेन्शनफ्री असतात. या नियमामुळे संघातील खेळाडूंचा आत्मविश्वासही वाढतो आणि ते कसलंही टेन्शन न घेता रिलॅक्स माइंडसेटने खेळतात. मोठी धावसंख्या ही खेळाडूंच्या मानसिकतेमुळे होते. असे वक्तव्य माहीने केले आहे. दरम्यान रविवारी (२३ मार्च) झालेल्या मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात चेन्नईचा विजय झाला होता. पण चेन्नईच्या विजयापेक्षा धोनीच्या स्टेंपिंगची चर्चा झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tushar Apte : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपचा स्वीकृत नगरसेवक

Shocking : "तुला पाळी आली असेल तर पुरावा दाखव", शिक्षिकेची अपमानास्पद वागणूक, विद्यार्थिनीचा मृत्यू; सरकारी कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

Pooja Sawant Mangalsutra: मराठमोळा साज! हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग लांब मंगळसूत्राचे पॅटर्न

Yuzvendra And Dhanashree: डिव्होर्सनंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा येणार एकत्र; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव, बहीण-भाऊ अन् बापाचा होरपळून मृत्यू, गाढ झोपेत असतानाच....

SCROLL FOR NEXT