MI VS CSK Live Match : चिते की चाल, बाज की नजर और धोनी की स्टंपिंग.. 0.12 सेकंदात सूर्याला केलं बाद, Video व्हायरल

Mahendra Singh Dhoni : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स सामन्यामध्ये महेंद्रसिंह धोनीच्या स्टंपिंगची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. धोनीने वायुवेगाने स्टंपिंग करत कर्णधार सूर्यकुमार यादवला बाद केले.
MIVSCKS MS DHONI
MIVSCKS MS DHONIX (Twitter)
Published On

MS Dhoni MI VS CSK Live : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा महामुकाबला चेपॉकमध्ये रंगला आहे. या सामन्यामध्ये महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली आहे. धोनीने विद्युत वेगाने स्टंपिंग केली आणि मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादवला बाद केले. एमएस धोनीच्या या स्टंपिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दहाव्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा सावधगिरी बाळगत खेळत होते. त्याच दरम्यान नूर अहमदने टाकलेल्या गुगलीवर सूर्यकुमार यादव बाद झाला. बॉल जसा धोनीच्या हातात आला, तसा त्याने स्टंपिंग करत सूर्याला माघारी पाठवले. दहाव्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर कर्णधार बाद झाल्यानंतर बाराव्या ओव्हरमध्ये तिलक वर्मा देखील नूर अहमदच्या बॉलवर एलबीडब्लू आउट झाला.

MIVSCKS MS DHONI
MI VS CSK Live IPL 2025 : रोहितचा चल रे भोपळ्या टुणूक टुणूक.. पहिल्याच सामन्यात हिटमॅन फेल, Video व्हायरल

ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुढे मैदानामध्ये रोहित शर्मा आणि रियान रिकल्टन फलंदाजी करण्यासाठी उतरले. रोहित शर्मा पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला. पुढे रियान, विल जॅक्स, सूर्या, तिलक वर्मा, नमन धीर असे सर्वजण एकापाठोपाठ तंबूत परतले.

MIVSCKS MS DHONI
IPL 2025 : लहान वयात आईला गमावलं, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर काकानं सांभाळलं, हालाखीच्या स्थितीतून 'या' खेळाडूनं SRH संघात स्थान मिळवलं

पहिल्याच ओव्हरमध्ये शून्यावर बाद झालेल्या रोहित शर्माच्या नावावर नकोसा रेकॉर्ड बनला आहे. आयपीएलच्या इतिहासात तो सर्वात जास्त वेळा शून्यावर बाद होणारा खेळाडू ठरला आहे. यात रोहितने दिनेश कार्तिकशी बरोबरी केली आहे. रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक दोघेही १८ वेळा भोपळा न फोडता परतले आहेत.

MIVSCKS MS DHONI
IPL 2025 : आर्चरला हैदराबादनं टॉर्चर केलं! चार ओव्हरमध्ये तब्बल 'इतक्या' धावांनी चोपलं, चौकार, षटकारांनी धू धू धुतलं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com