IPL 2025 : आर्चरला हैदराबादनं टॉर्चर केलं! चार ओव्हरमध्ये तब्बल 'इतक्या' धावांनी चोपलं, चौकार, षटकारांनी धू धू धुतलं..

SRH VS RR : हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्यामध्ये हैदराबादच्या संघाने तब्बल २८६ धावा केल्या. राजस्थानच्या गोलंदाजांनी हैदराबादसमोर अक्षरक्ष गुडघे टेकले. त्यातही जोफ्रा आर्चरने खूप वाईट गोलंदाजी केली.
jofra archer
jofra archerx (twitter)
Published On

Jofra Archer : आयपीएल २०२५ च्या पहिल्या डबल हेडर सामन्यांपैकी पहिला सामना हैदराबादमध्ये रंगला आहे. या सामन्यात हैदराबाद आणि राजस्थान हे दोन संघ एकमेकांसमोर आले आहेत. टॉस जिंकत राजस्थानच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संजू सॅमसन दुखापतग्रस्त असल्याने रियान परागकडे संघाचे नेतृत्त्व देण्यात आले.

टॉस हारल्यानंतर हैदराबाद संघाचे फलंदाज मैदानामध्ये उतरले. अभिषेक शर्मा २४ धावा करत परतला. पुढे ट्रेव्हिस हेड आणि इशान किशन यांनी मोर्चा सांभाळला. हेड ६७ धावा करुन बाद झाला. त्यानंतर हेनरिक क्लासिन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांवर दबाव आणला. यात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने सगळ्यात जास्त ७६ धावा दिल्या.

जोफ्रा आर्चरच्या ४ ओव्हर्समध्ये सनरायजर्स हैदराबादच्या खेळाडूंनी एकूण ७६ धावा केल्या. आजच्या सामन्यामध्ये आर्जरने सर्वात वाईट खेळी केली. फक्त आर्चरच नाही तर अन्य गोलंदाजांनाही हैदराबादने पाणी पाजले. संदीप शर्माने ५१, फजहलहक फारुकीने ४९, तर महिश तीक्षानाने ५२ धावा दिल्या आहेत.

jofra archer
IPL 2025 : लहान वयात आईला गमावलं, वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर काकानं सांभाळलं, हालाखीच्या स्थितीतून 'या' खेळाडूनं SRH संघात स्थान मिळवलं

सामन्यामध्ये इशान किशन चमकला. त्याने ४७ धावांमध्ये १०६ धावा केल्या. यात ११ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. त्याच्या शतकीय खेळीमुळे हैदराबादने एकूण २८६ धावा केल्या. मागच्या वर्षी हैदराबादने २८७ धावा करत इतिहास रचला होता. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा हैदराबादचा विक्रम फक्त १ धावाने हुकला.

jofra archer
Ishan kishan : हलक्यात घेऊ नका! मुंबईने सोडलं, हैदराबादने उचललं; ४५ बॉलमध्ये शतक ठोकत ईशानने राजस्थानला फोडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com