gerald cotezee twitter
Sports

IPL 2025 Mega Auction: ना बटलर, ना स्टार्क; मेगा ऑक्शनमध्ये हा स्टार ऑलराऊंडर करणार मार्केट जाम

Gerald Coetzee: आगामी आयपीएल लिलावात कोणत्या स्टार खेळाडूवर मोठी बोली लागू शकते, जाणून घ्या.

Ankush Dhavre

IPL 2025 Mega Auction, Gerald Coetzee: आगामी मेगा ऑक्शन २०२५ चा थरार येत्या २४ आणिा २५ नोव्हेंबरला सौदी अरेबियातील जेह्हादमध्ये रंगणार आहे. या ऑक्शनमध्ये केएल राहुल, रिषभ पंत, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यरसारख्या स्टार खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.

यासह जोस बटलर, क्विंटन डी कॉक आणि मिचेल स्टार्कसारखे परदेशी खेळाडू देखील ऑक्शनमध्ये असणार आहेत. दरम्यान एक असा खेळाडू आहेत, जो ऑक्शनमध्ये मार्केट जाम करु शकतो.

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता. मात्र गेराल्ड कोएत्जीने भारतीय संघाचा तोंडचा घास पळवला. गोलंदाजीत शानदार कामगिरी केल्यानंतर त्याने फलंदाजीतही योगदान दिलं. त्याने २३ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर गोलंदाजीत ३ गडी बाद केले.

गेल्या हंगामात कोएत्जी मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसून आला होता.मुंबई इंडियन्सने त्याला ५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं होतं. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना त्याने १३ सामन्यांमध्ये ५ गडी बाद केले होते. मात्र आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान मेगा ऑक्शनमध्ये कोणता संघ त्याच्यावर मोठी बोली लावणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

असा राहिलाय रेकॉर्ड

कोएत्जीच्या टी-२० क्रिकेटमधील रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १० सामन्यांमध्ये १३ गडी बाद केले आहेत. तर ३ कसोटी सामन्यांमध्ये त्याला १० गडी बाद करता आले आहेत. यासह वनडे क्रिकेटमधील १४ सामन्यांमध्ये त्याला ३१ आणि ८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १२ गडी बाद करता आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT