IND vs AUS: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीत हा स्टार फलंदाज ओपनिंग करणार

Rohit Sharma Replacement: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटीत डावाची सुरुवात कोण करणार, याबाबत गौतम गंभीरने मोठा खुलासा केला आहे.
IND vs AUS: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीत हा स्टार फलंदाज ओपनिंग करणार
rohit sharmatwitter
Published On

भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील पहिल्या आणि कदाचित दुसऱ्या कसोटी सामन्यालाही मुकणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत डावाची सुरुवात कोण करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता गंभीरने त्या खेळाडूचं नाव सांगितलं आहे.

IND vs AUS: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीत हा स्टार फलंदाज ओपनिंग करणार
IND vs SA: कोएत्जीने टीम इंडियाच्या तोंडचा घास पळवला! भारताच्या हातून असा निसटला सामना

या मालिकेसाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आली आहे.

या संघात सलामीला फलंदाजी करण्यासाठी अभिमन्यू ईश्वरनचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे रोहितच्या अनुपस्थितीत ईश्वरनला सलामीची संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र गंभीरने आता सलामीला कोण कोणार हे उघडपणे सांगितलं आहे.

IND vs AUS: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीत हा स्टार फलंदाज ओपनिंग करणार
IND vs SA: नॉर्मल वाटलोय का? Tilak Varmaचा कोएत्जीला स्टेडियमबाहेर षटकार - VIDEO

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ या दोन्ही संघांमध्ये २ अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी केएल राहुलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. त्याला सलामीची संधी देखील दिली गेली. यावरुन स्पष्ट झालं होतं की, टीम मॅनेजमेंट केएल राहुलकडे सलामीवीर फलंदाज म्हणून पाहत आहे.

IND vs AUS: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीत हा स्टार फलंदाज ओपनिंग करणार
IND vs AUS: पर्थ कसोटीसाठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११! हा विस्फोटक फलंदाज करणार पदार्पण

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होण्यापूर्वी गौतम गंभीर केएल राहुलचं कौतुक करताना दिसून आा आहे. गंभीर म्हणाला, ' तो टॉप ऑर्डरला फलंदाजी करु शकतो, ही त्याची क्वालिटी आहे. तो तिसऱ्या आणि सहाव्या क्रमांकावरही फलंदाजीला येऊ शकतो. यासह वनडे क्रिकेटमध्ये तो यष्टीरक्षणही करतो.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' तुम्हीच विचार करा ना , आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे किती खेळाडू आहेत जे डावाची सुरुवात करतील आणि सहाव्या क्रमांकावरही फलंदाजीला येतील. त्यामुळे मला तरी वाटतं की, रोहित उपलब्ध नसल्यास, गरज पडल्यास राहुल सलामीला फलंदाजीसाठी शकतो.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com