India vs Australia, 1st Test: न्यूझीलंडविरुद्धचा मायदेशातील पराभव विसरुन भारतीय संघ आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलमध्ये जाण्यासाठी ही मालिका कुठल्याही परिस्थितीत जिंकावी लागणार आहे.
या मालिकेतील पहिला सामना २२न नोव्हेंबरपासून पर्थच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.
मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा नसेल हे जवळजवळ कन्फर्म झालं आहे. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माऐवजी जसप्रीत बुमराह पाडताना दिसेल. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी गौतम गंभीरने याबाबत संकेत दिले होते. रोहितऐवजी केएल राहुल डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो.
या मालिकेसाठी भारताचा युवा स्टार फलंदाज नितीश कुमार रेड्डीचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. नुकतीच ऑस्ट्रेलिया ए आणि भारत ए या दोन्ही संघांमध्ये अनधिकृत कसोटी मालिका पार पडली.
या मालिकेसाठी त्याचा भारतीय ए संघात समावेश करण्यात आला होता. तो आक्रमक फलंदाजीसह वेगवान गोलंदाजीही करु शकतो. त्यामुळे त्याचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो.
यासह केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात येऊ शकते. तर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आणि विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो.
रिषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. त्यानंतर नितिश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर खेळताना दिसून येऊ शकतात. ऑस्ट्रेलियात वेगवान गोलंदाजांनाम मदत मिळते, त्यामुळे आर अश्विनला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं कठीण आहे. वेगवान गोलंदाज म्हणून, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी दिली जाऊ शकते.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, सरफराज खान, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रविंद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू: मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.