IND vs SA, 1st Inning: हार्दिक पंड्या एकटा लढला! टीम इंडियाने आफ्रिकेसमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान

India vs South Africa 2nd T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी -२० सामन्यात हार्दिक पंड्याची एकाकी झुंज पाहायला मिळाली आहे.
IND vs SA, 1st Inning: हार्दिक पंड्या एकटा लढला! टीम इंडियाने आफ्रिकेसमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान
HARDIK PANDYAtwitter
Published On

India vs South Africa 2nd T20I: सेंट जॉर्ज ओव्हलच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ४ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. भारतीय संघाला २० षटकअखेर १२४ धावा करता आल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी १२५ धावांची गरज आहे.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. हा निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. पहिल्याच षटकात संजू सॅमसन शून्यावर बाद होऊन माघारी परतला.

त्यानंतर पुढच्याच षटकात अभिषेक शर्मा बाद होऊन माघारी परतला. भारताची सलामी जोडी पूर्णपणे फ्लॉप ठरली. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवही ४ धावांवर तंबूत परतला. भारताला अवघ्या १५ धावांवर तिसरा धक्का बसला. तिलक वर्माने आणि अक्षर पटेलने मिळून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर पटेल २७ आणि तिलक २० धावांवर माघारी परतले.

IND vs SA, 1st Inning: हार्दिक पंड्या एकटा लढला! टीम इंडियाने आफ्रिकेसमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान
IND vs SA: दुसऱ्या सामन्यासाठी सूर्याचा मास्टरप्लान! या ११ खेळाडूंसह उतरणार मैदानात

शेवटी रिंकू सिंगलाही हवा तसा फिनिश करता आला नाही. तो ९ धावा करत माघारी परतला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला हार्दिक पंड्या शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने ३९ धावांची खेळी करत भारतीय संघाचा डाव ६ गडी बाद १२४ धावांपर्यंत पोहोचवला. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना मार्को यानसेन, गेराल्ड कोएत्जी, सिमलेन, एडेन मार्करम आणि पिटरने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

IND vs SA, 1st Inning: हार्दिक पंड्या एकटा लढला! टीम इंडियाने आफ्रिकेसमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान
IND vs SA 2nd T20I: भारत - दक्षिण आफ्रिका सामन्याची वेळ बदलली! दुसरा सामना किती वाजता सुरू होणार?

भारत: संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवि बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान

दक्षिण आफ्रिका: रायन रिकेल्टन, रिझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, अँडिले सिमेलाने, जेराल्ड कोएटझी, केशव महाराज, नकबायोम्जी पीटर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com