IND vs SA, Team India Playing XI Prediction: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघामध्ये ४ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी पराभव केला. आता मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिकेत कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. मालिकेतील दुसरा सामना आज (१० नोव्हेंबर) गकेबरहामध्ये रंगणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या मैदानावर आतापर्यंत अनेक मोठे स्कोअर पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे आज होणारा सामनाही हाय स्कोरिंग असू शकतो. यासह ढगाळ वातावरण असल्यामुळे गोलंदाजांनाही मदत मिळू शकते.
मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला मायदेशात खेळण्याचा फायदा घेता आला नव्हता. भारताने या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या सामन्यात कमबॅक करताना दिसून येऊ शकतो. त्यामुळेच दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळेल.
भारतीय संघ- संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई/यश दयाल, वरुण चक्रवर्ती, आवेश खान आणि अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका- रिजा हेंड्रिक्स, रियान रिकेल्टन, एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), डेविड मिलर, मार्को यानसेन, केशव महाराज, गेराल्ड कोएत्ज़ी, नकाबायोमज़ी पीटर आणि ओटनील बार्टमन
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.