भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी बॉर्डर-गावसकर मालिका सुरु व्हायला अवघे १० दिवस शिल्लक राहिले आहेत. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये रंगणार आहे.
हा दौरा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण भारतीय संघाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर ही मालिका ४-१ ने जिंकावी लागणार आहे. त्यामुळे रोहित आणि विराटवर मोठी जबाबदारी असणार आहे. दरम्यान या मालिकेत या दोन्ही खेळाडूंचा रेकॉर्ड कसा राहिला आहे, जाणून घ्या.
विराट कोहलीला बॉर्डर- गावसकर मालिका खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. तर रोहितला या मालिकेत विराटइतका अनुभव नाही. मात्र दोघांनीही २० पेक्षा अधिक डावात फलंदाजी केली आहे. त्यामुळे तुलना केली जाऊ शकते.
विराट आणि रोहितचा या मालिकेतील इतिहास पाहिला, तर विराट ४२ वेळेस फलंदाजीला आला आहे. यादरम्यान विराटला १९७९ धावा करता आल्या आहेत. तर रोहित २० डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. यादरम्यान त्याला ६५० धावा करता आल्या आहेत. या मालिकेत दोघांनाही द्विशतकी खेळी करता आलेली नाही.
विराट कोहलीने बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत ४८.२६ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने ३४.२१ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. दोघांच्या स्ट्राईक रेटबद्दल बोलायचं झालं, तर विराटने ५२.२५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
याउलट सलामीला फलंदाजीसाठी येणाऱ्या रोहितने ५१.१४ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. या मालिकेत रोहित शर्माला केवळ १ शतकी खेळी करता आली आहे. तर विराटने ८ शतकं झळकावली आहेत.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.