भारतातील विराट कोहली क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे. तसेच भारतात विराट एक प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. विराट त्याच्या क्रिकेटमुळे आणि वैयक्तिक जीवनामुळे खूप चर्चेत असतो. सोशल मीडियावर विराट कोहलीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. पण जेव्हा फिटनेसची गोष्ट येते तेव्हा आपोआप विराट कोहली नाव डोळ्यांसमोर येते. मैदानावरील त्याचा उत्साह, ऊर्जा पाहून तो नेहमीच चाहत्यांच्या लक्ष वेधून घेत असतो. विराट कोहलीचे फिटनेस प्रेम पाहून प्रत्येकाच्या मनात त्याच्या फिटनेसविषयी प्रश्न निर्माण होत असतात. म्हणून आज तुम्हाला विराट कोहलीचे फिटनेस रहस्य आणि आहार सांगणार आहोत. तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात विराट कोहलीचे डाएट प्लॅन फॅालो करु शकता.
क्रिकेटर विराट कोहलीने एका मुलाखतीत आपल्या फिटनेस आणि डाएट बद्दल सांगितले होते. विराटच्या आहारात कडधान्ये, हिरव्या भाज्या आणि अन्य सर्व पदार्थांचा समावेश आहे. विराट त्याच्या दिवसाची सुरुवात प्रोटीन आहाराने करतो. यामुळे त्याला दिवसभर एनर्जेटिक वाटते. दुपारच्या जेवणात तो योग्य आहाराबरोर भरपूर फळे, ग्रीन सलाड खातो. संध्याकाळी विराट ड्रायफ्रूट, प्रोटीन बार यांचे सेवन करतो. रात्रीच्या जेवणात विराट हलके जेवण करतो.
याबरोबर स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी तो एल्कलाइन वॅाटर पितो. हे पाणी त्याचे डिहायड्रेशन समस्येपासून बचाव करतात. याबरोबर तो ग्लूटनेयुक्त आणि गोड असलेले पदार्थ खात नाही. तसेच तो दुग्धजन्य पदार्थ खाण्याचे टाळतो. विराटचे आहारातील सर्व जेवण उकळलेले आणि वाफवलेले असते. विराटच्या मते योग्य आहारच फिट राहण्यासाठी खूप गरजेचा आहे. याबरोबर तुम्ही सु्द्धा योग्य आहार घेतला तर तुम्ही ही फिट राहू शकता.
यंग आणि फिट असणारा विराट योग्य आहाराबरोबर व्यायाम देखील करतो. विराट नेहमीच त्याचे व्यायाम रुटीन कठोरपणे फॅालो करत असतो. त्याच्या फिटनेस रुटीनमध्ये वेट ट्रेनिंग, स्ट्रेन्थ बिल्डिंग, रनिंग आणि कार्डियोचा समावेश आहे. मॅच असताना विराट सुमारे दोन तास व्यायाम करतो. विराट कोहली दररोज शरीरासाठी आठ तासांची झोप घेतो. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टींची खूप आवश्यकता असते. याबरोबर तो स्वत:च्या मन शांती साठी दररोज मेडिटेशन करतो.