IPL 2025 X
Sports

आम्हीही ३०० करु शकतो, IPL गाजवणाऱ्या प्रसिद्ध खेळाडूचा दावा, नेमकं कुणी म्हटलं?

IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये सनरायजर्स हैदराबाद ३०० धावा करेल असा अंदाज वर्तवला जात होता. पण त्यांना आतापर्यंत ३०० धावा करणे शक्य झालेले नाही. आता दुसऱ्या संघातील एका खेळाडूने ३०० धावा करण्याचा दावा केला आहे.

Yash Shirke

IPL 2025 मध्ये एका इनिंग्समध्ये ३०० धावसंख्या पाहायला मिळेल असे बरेचसे लोक म्हणत होते. मागच्या वर्षीचा सनरायजर्स हैदराबादची कामगिरी पाहून ते यंदाच्या सीझनमध्ये सहज ३०० धावा करतील असा अंदाज वर्तवला होता. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात हैदराबादने २८६ धावा केल्या. त्यानंतर हैदराबादने निराशा केली. सध्या केकेआरचा स्टार खेळाडू रिंकू सिंहने ३०० धावांबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ मध्ये ट्रॉफी मिळवली होती. पण या सीझनमध्ये केकेआरने सूर गमावल्याचे पाहायला मिळत आहे. एकूण ८ सामन्यांपैकी फक्त ३ सामन्यांमध्ये केकेआरचा विजय झाला आहे. तर ५ सामने त्यांनी गमवाले आहेत. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी हा संघ संघर्ष करत आहे. पण तरीही रिंकू सिंहने आम्ही ३०० धावसंख्या पार करण्याचा दावा केला आहे.

जिओहॉटस्टारशी रिंकूने संवाद साधला. तो म्हणाला, आयपीएलमध्ये आम्ही सध्या अशा परिस्थितीमध्ये आहोत, जेथे अशा गोष्टी शक्य आहेत. होय, आम्ही नक्कीच करु शकतो. ३०० धावा करणे शक्य आहे. गेल्या वर्षी पंजाबने २६२ धावांचा पाठलाग केला होता. या वर्षी प्रत्येक संघ खूप मजबूत आहे आणि कोणीही ३०० चा टप्पा गाठू शकतो.

गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना रिंकू सिंहने यश दयालने शेवटच्या ५ चेंडूंवर ५ षटकार ठोकले होते. त्यानंतर रिंकू सिंहची प्रसिद्धी वाढत गेली. या सीझनमध्ये रिंकू चमकदार कामगिरी करु शकला नाहीये. त्याने ३३.२५ च्या सरासरीने ८ सामन्यांमध्ये १३३ धावा केल्या आहेत. स्ट्राईक रेट १४६.१५ इतका आहे. रिंकू परत जुन्या फॉर्ममध्ये येईल असे चाहते म्हणत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT