Virat Kohli Royal Challengers Bengaluru X
Sports

RCB Vs PBKS IPL 2025 : विराट कोहलीसाठी मला वाईट वाटतंय, पण IPL 2025 तर पंजाब किंग्सच जिंकणार...!

RCB Vs PBKS IPL 2025 Final : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स हा आयपीएल २०२५ मधील सामना येत्या काही तासात सुरु होणार आहे. सामना सुरु होण्यापूर्वी एका भविष्यवाणीने आरसीबी आणि विराट कोहलीच्या चाहत्यांची चिंता वाढवली आहे.

Yash Shirke

IPL 2025 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. बंगळुरू आणि पंजाब या दोन्ही संघांनी जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. दोन्ही संघांना एकदाही जेतेपद मिळाले नसल्याने ट्रॉफी जिंकण्यासाठी बंगळुरू-पंजाब जीवाची बाजी लावतील. सामना सुरु होण्यापूर्वी एका भविष्यवाणीमुळे आरसीबीच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.

ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची कर्णधार एलिसा हिलीने विराट कोहलीबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. पंजाबचा संघ आरसीबीकडून आयपीएल २०२५ चे विजेतेपद हिसकावून घेणार असल्याचे एलिसाने म्हटले आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघांवर दबाव असेल, पण आरसीबीला जास्त दबाव जाणवेल कारण त्यांचा भूतकाळ खूपच निराशाजनक आहे. याआधी ते तीन वेळा अंतिम सामना खेळले आहे आणि तिन्ही वेळेस त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

एलिसा हिलीने LiSTNR स्पोर्ट पॉडकास्टमध्ये आयपीएल फायनलवर भाष्य केले. "दोन्हीही संघांनी एकदाही अंतिम सामना जिंकलेला नाही. ट्रॉफी जिंकता-जिंकता हरणाऱ्या आरसीबीवर विजेतेपदासाठी खूपच दबाव असेल. त्यांना काहीही करुन ट्रॉफी जिंकायची आहे. पण यावेळी पंजाब किंग्स त्यांच्याकडून ट्रॉफी हिसकावून घेतील", असे एलिसा हिलीने म्हटले आहे.

मी विराट कोहलीसाठी सॉरी फिल करते. त्याच्यासाठी मला फार वाईट वाटते. प्रत्येक फायनलमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे, असेही एलिसा हिलीने पॉडकास्टदरम्यान म्हटले आहे. एलिसा हिली ही ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची कर्मधार आहे. ती ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मिचेल स्टार्कची पत्नी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : वेळ अन् पैसा वाया जाणार; ५ राशींच्या लोकांचे महत्वाचे कामे रखडणार, वाचा रविवारचं राशीभविष्य

Malavya Rajyog: 12 महिन्यांनी बनणार मालव्य राजयोग; 'या' ३ राशींवर शुक्राची राहणार कृपा, धनलाभ होणार

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

SCROLL FOR NEXT