...तर RCB चे १८ वर्षांनंतरही ट्रॉफीचं स्वप्न पूर्ण होणार नाही, पंजाब किंग्स बनणार चॅम्पियन; कारण

RCB Vs PBKS IPL 2025 Final : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स हा आयपीएल २०२५ मधील फायनल सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून कोण आयपीएलची ट्रॉफी जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
royal challengers bengaluru
royal challengers bengalurux
Published On

IPL 2025 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. बंगळुरू आणि पंजाब या दोन्ही संघांनी आयपीएलच्या १८ वर्षात एकदाही ट्रॉफी जिंकलेली नाही. पंजाबने २०१४ मध्ये, तर बंगळुरूने २०१६ मध्ये शेवटचा अंतिम सामना खेळला होता. आता दोन्ही संघांना ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.

royal challengers bengaluru
Punjab Kings ला एकहाती सामना जिंकून देणाऱ्या श्रेयस अय्यरला BCCI चा मोठा दणका

मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यामध्ये आमनेसामने आले होते. तेव्हा सामना सुरु होण्याआधी पाऊस पडला होता. पावसामुळे सामना दीड ते दोन तास रखडला होता. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या क्वालिफायर २ सामन्याला ९.४५ वाजता सामन्याला सुरुवात झाली होती. आयपीएल फायनल देखील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे आणि फायनलच्या दिवशीदेखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

royal challengers bengaluru
IPL 2025 Final : पंजाबविरुद्ध फायनलआधीच RCB ला जोरदार झटका; मॅचविनर फलंदाज होणार बाहेर

अंतिम सामन्यात पाऊस पडला तर...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यादरम्यान पाऊस पडला तर १२० मिनिटे म्हणजेच २ तासांचा अतिरिक्त कालावधी सामन्यासाठी उपलब्ध केला जाईल. पावसामुळे सामना रद्द करावा लागला, तर रिझर्व्ह डेला म्हणजेच बुधवारी (४ जून) अंतिम सामना खेळवला जाईल. जर रिझर्व्ह डेला सुद्धा पाऊस पडला आणि सामना रद्द करावा लागला, तर आयपीएलच्या नियमांनुसार, जो संघ पॉईंट्स टेबलवर टॉपवर आहे, त्याला विजेतेपद मिळेल. थोडक्यात आयपीएल २०२५ ची ट्रॉफी पंजाबकडे जाईल.

royal challengers bengaluru
IPL 2025 फायनलपूर्वी विराट कोहलीला जोरदार धक्का, बंगळुरू पोलिसांनी केली मोठी कारवाई

आयपीएल २०२५ मध्ये पंजाब आणि बंगळुरू या दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली आहे. श्रेयस अय्यर आणि रजत पाटीदार या दोन्ही युवा खेळाडूंकडे संघ व्यवस्थापनाने कर्णधारपदाची धुरा सोपावली होती. दोन्ही कर्णधारांनी दिलेली जबाबदारी पेलली. सध्या पॉईंट्स टेबलवर पंजाब पहिल्या, तर बंगळुरू दुसऱ्या स्थानी आहे. आता अंतिम सामन्यात कोणता संघ बाजी मारेल आणि ट्रॉफी उचलेल याकडे सर्व क्रिकेटचाहत्यांचे लक्ष लागले आहे.

royal challengers bengaluru
Rohit Sharma खेळला IPL मधील शेवटचा सामना? मुंबईच्या पराभवानंतर हिटमॅनची कारकीर्द संपली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com