
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये धुमाकूळ घालत आहे. विराटचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. आरसीबीला ट्रॉफी जिंकण्यासाठी फक्त एक सामना जिंकावा लागणार आहे. आयपीएलमध्ये व्यग्र असलेल्या विराट कोहलीला मोठा धक्का बसला आहे.
बंगळुरूमधील वन ८ कम्यून पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे. हा पब विराट कोहलीच्या मालकीचा आहे. यापूर्वीही वन ८ कम्यून पबवर कारवाई करण्यात आली होती. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा (COTPA) २००३ अंतर्गत विराटच्या पबविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा पब चिन्नास्वामी स्टेडियमजवळील रत्नम कॉम्प्लेक्सच्या सहाव्या मजल्यावर आहे.
वन ८ कम्यून पबवर धूम्रपान क्षेत्राच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार पोलिसांनी मिळाली होत. त्यानंतर १ जून रोजी क्यूबन पार्क पोलीस स्थानकामध्ये पबच्या व्यवस्थापकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. पबमध्ये धूम्रपान क्षेत्राबाबतच्या आवश्यक नियमांचे पालन करण्यात आले नव्हते. पब व्यवस्थापनाने COTPA कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केले नसल्याचे तपासातून समोर आले. यापूर्वीही जुलै २०२४ मध्ये बंगळुरू पोलिसांनी पबविरुद्ध कारवाई केली होती. डिसेंबर २०२४ मध्ये अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पबला नोटीस बजावण्यात आली होती.
वन ८ कम्यून ही विराट कोहलीची प्रसिद्ध रेस्टॉरंट आणि पब चेन आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, बंगळुरू यांसारख्या महानगरांमध्ये या रेस्टॉरंट आणि पब चेनच्या शाखा आहेत. यापैकी बंगळुरूमधील पबबद्दल सतत चर्चा होत असल्याचे पाहायला मिळते. हा पब चिन्नास्वामी स्टेडियमपासून जवळ असलेल्या कस्तुरबा रोडवर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.