
IPL 2025 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यामध्ये पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केले. पराभवामुळे मुंबईचे यंदाच्या सीझनमधील आव्हान संपुष्टात आले आहे. मुंबईचा संघ आयपीएलमधून बाहेर गेल्यानंतर रोहित शर्माच्या आयपीएलमधील भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रोहित यापुढे आयपीएलमध्ये खेळताना दिसणार की नाही असा सवाल अनेकजण विचारत आहेत.
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी त्याने कसोटी क्रिकेटमधूनही संन्यास घेतला. रोहित फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आल्यानंतर रोहित शर्मा फक्त सलामीसाठी मैदानात उतरला.
मुंबई इंडियन्सकडून आयपीएल २०२५ मध्ये रोहित शर्मा सलामीसाठी १५ वेळा उतरला. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून त्याला खेळवले जाते. रोहित क्वचितच क्षेत्ररक्षण करताना दिसला आहे. रोहित शर्मा ३८ वर्षांचा आहे. क्षेत्ररक्षणासाठी तो पूर्णपणे तंदुस्त नसल्याचेही म्हटले जात आहे. सीझनमधील बऱ्याचश्या सामन्यात गोलंदाजीच्या वेळी तो बेंचवर बसताना दिसला आहे. त्याचा फलंदाजीतला फॉर्मही फारसा प्रभावी नाही. रोहित पुढच्या सीझनमध्ये खेळताना दिसेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आयपीएल २०२५ च्या क्वालिफायर २ सामन्यात पराभूत झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले. क्वालिफायर २ सामन्यात रोहित शर्मा फक्त ८ धावांवर बाद झाला. रोहित जेव्हा ३ धावांवर खेळत होता, तेव्हा त्याला जीवनदान मिळाले, पण याचा फायदा झाला नाही. आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये रोहितने १५ सामने खेळले. यात २९.८५ च्या सरासरीने त्याने ४१८ धावा केल्या. यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितने आयपीएलमध्ये ३०० षटकार मारण्याचा विक्रम रचला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.