
IPL 2025 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यामध्ये पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ आमनेसामने आले. पंजाबने ५ विकेट्सने मुंबईचा पराभव केला. या विजयानंतर पंजाब किंग्सने फायनलमध्ये जागी पक्की केली. आता ३ जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स अशी लढत फायनल सामन्यात पाहायला मिळणार आहे.
सर्वत्र आयपीएल फायनलची धामधुम असताना भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वीरुने केलेल्या विधानाची चर्चा पाहायला मिळत आहे. 'आयपीएल फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मी सपोर्ट करतो' वीरेंद्र सेहवागने असे म्हटले आहे. हा व्हिडीओ कालचा (१ जून) पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना संपल्यानंतरच्या कार्यक्रमादरम्यानचा असल्याचे म्हटले जात आहे.
'बंगळुरू की पंजाब, कोणाकडे जाणार आयपीएल २०२५ ची ट्रॉफी?' असा प्रश्न गौरव कपूरने सेहवागला विचारला. त्यावर वीरुने 'मला वाटतंय आरसीबी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएल २०२५ जिंकेल. मी आता माझ्या जुन्या अवतारात आलोय. मी बऱ्याच संघांना सपोर्ट केला. मी ज्या-ज्या संघाला सपोर्ट केला, तो संघ पराभूत झाला आहे. क्वालिफायर १ मध्ये पंजाबला सपोर्ट केला, पंजाबचा पराभव झाला. एलिमिनेटरमध्ये गुजरात जिंकेल असं म्हटलं, गुजरातचा संघ एलिमिनेट झाला. क्वालिफायर २ मध्ये मुंबईला सपोर्ट केला, मुंबईचा संघ हरला' असे उत्तर दिले. लगेच गौरव कपूरने 'एक मिनिट.. मग तुम्ही कोणत्या संघाला सपोर्ट करत आहात?' असे म्हटले. वीरु एक क्षणाचा विलंब न करता 'आरसीबी' म्हणाला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे दोन संघ आयपीएल २०२५ च्या पॉईंट्स टेबलमध्ये टॉप २ मध्ये आहेत. क्वालिफायर १ मध्ये हे दोन्ही संघ एकमेकांच्या आमने-सामने आले होते. तेव्हा बंगळुरूने पंजाबवर सहज विजय मिळवला होता. आता फायनलच्या निमित्ताने दोन्ही संघ पुन्हा भिडणार आहेत, तेव्हा कोणता संघ विजयी होईल याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.