Phil Salt RCB X
Sports

RCB साठी गुड न्यूज! मायदेशी गेलेला मॅचविनर खेळाडू भारतात परतला

RCB Vs PBKS हा आयपीएल २०२५ मधील अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामन्याआधी आरसीबीच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

Yash Shirke

IPL 2025 चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या दोन संघांमध्ये होणार आहे. यंदा आयपीएलला नवा विजेता मिळणार आहे. दोन्ही संघांनी एकदाही ट्रॉफी जिंकलेली नाही. बंगळुरूने संपूर्ण सीझनमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आरसीबीचा संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. आरसीबीचा मॅचविनर खेळाडू फिल सॉल्ट फायनलमध्ये सहभागी होणार नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, पण तो अंतिम सामना खेळण्यासाठी परतल्याची माहिती समोर आली आहे.

फायनल सामन्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या सराव सत्राला फिल सॉल्ट अनुपस्थित होता. त्याच्या अनुपस्थितीमुळे आरसीबीच्या चाहत्यांचे टेन्शन वाढले होते. सॉल्ट फायनल खेळणार की नाही असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. फिल सॉल्टने बंगळुरूकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्याची अनुपस्थिती आरसीबीसाठी डोकेदुखी बनली असती.

फिल सॉल्ट बाबा झाला आहे. मुलाच्या जन्मासाठी तो घरी परतल्याचे म्हटले जात होते. पण अंतिम सामना खेळण्यासाठी तो भारतात परतल्याची माहिती समोर आली आहे. मुलाच्या जन्मासाठी घरी परतल्यानंतर सॉल्टने पुन्हा भारतात परतण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी (३ जून) सकाळी लवकर फिल सॉल्ट अहमदाबादला परतल्याचे वृत्त समोर आले आहे. सॉल्ट परतल्याने आरसीबीचे टेन्शन दूर झाले आहे.

फिल सॉल्ट हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. त्याने या सीझनमध्ये आरसीबीकडून १२ सामने खेळले आहे. सॉल्टने १७५.९० च्या स्ट्राईक रेटने आणि ३५.१८ च्या सरासरीने ३८७ धावा केल्या आहेत. तो विराट कोहलीसह सलामीसाठी उतरतो. सॉल्टच्या खेळीवरुन तो आरसीबीसाठी किती महत्त्वाचा आहे हे स्पष्ट होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

Nashik Food : नाशिकच्या Top 7 डीशेस ज्या पाहताच तोंडाला सुटेल पाणी

Crime News: होम गार्डच्या परीक्षेवेळी तरुणी बेशुद्ध पडली; रुग्णालयात नेताना अ‍ॅम्ब्युलन्समध्येच सामूहिक बलात्कार

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

SCROLL FOR NEXT