Ayush Mhatre Vaibhav Suryavanshi X
Sports

Ayush Mhatre : वैभव सूर्यवंशीला फॉलो करु नकोस, आयुष म्हात्रेला वडिलांनी का दिला सल्ला?

Ayush Mhatre CSK : १७ वर्षीय आयुष म्हात्रेने चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण केले. तो ४ सामने खेळला आहे. चार इनिंग्समध्ये आयुषने १८५.२२ च्या स्ट्राईक रेटने १६३ धावा केल्या आहेत.

Yash Shirke

Ayush Mhatre IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्सचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे सध्या चर्चेत आहे. आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्यामध्ये आयुषने ४८ चेंडूत ९४ धावा केल्या होत्या. १७ वर्षांच्या आयुषच्या रुपात चेन्नईला दमदार खेळाडू भेटला असे म्हटले जात आहे. अशातच आयुष म्हात्रेच्या वडिलांनी 'वैभव सूर्यवंशीला फॉलो करु नकोस' असे म्हटले आहे. आयुषचे वडील योगेश म्हात्रे यांनी केलेल्या एका विधानाची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.

आयुष म्हात्रेने २० एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण केले. चार इनिंग्समध्ये त्याने ४०.७५ च्या सरासरीने आणि १८५.२२ च्या स्ट्राईक रेटने १६३ धावा केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यामध्ये आयुषचे शतक फक्त ६ धावांनी हुकले होते. उत्कृष्ट कामगिरीनंतर, आयुष म्हात्रेच्या वडिलांनी 'आयुषला वैभवचे अनुकरण करु नकोस', असा सल्ला दिला.

मिड-डेला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगेश म्हात्रे म्हणाले, "तू आणि वैभव हे दोघेही खूप वेगळे फलंदाज आहे. दोघांची फलंदाजी करण्याची शैली वेगवेगळी आहे. जर कोणी तुझी तुलना वैभवशी केली, तर ती गोष्ट मनावर घेऊ नकोस. वैभवला फॉलो करण्याचा प्रयत्न करु नकोस किंवा त्याच्यासारखं शतक ठोकण्याचा प्रयत्न करु नकोस. स्वत:वर कोणताही प्रकारचा दबाव घेऊन मोठी कामगिरी करण्याची अजिबात गरज नाही, तुला अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे, असे मी आयुषला सांगितले आहे."

आयपीएल २०२५ मधील चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. चेन्नई पॉईंट्स टेबलवर दहाव्या स्थानी आहे. फलंदाजी, गोलंदाजीसह अनेक विभागांमध्ये चेन्नईने खराब कामगिरी केली. या सीझनमध्ये अपयश मिळाल्यानंतर आता चेन्नईच्या संघाने पुढील सीझनसाठी म्हणजेच आयपीएल २०२६ साठी तयारी करायला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT