
सनरायजर्स हैदराबादचा आयपीएल २०२५ मध्ये खराब फॉर्म सुरु आहे. पॉईंट्स टेबलवर हैदराबादचा संघ नवव्या स्थानी आहे. याच दरम्यान हैदराबादचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. हैदराबादमधील लेग स्पिनर ॲडम झंपा दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला. त्याच्या जागी स्मरन रविचंद्रनने घेतली. पण रविचंद्रनही दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा हैदराबादकडून करण्यात आली आहे. विदर्भ संघातील अष्टपैलू खेळाडू हर्ष दुबेला हैदराबादने ३० लाख रुपयांमध्ये करारबद्ध केले आहे.
रणजी ट्रॉफी २०२४-२५ मध्ये हर्ष दुबेने इतिहास रचला. २२ वर्षीय हर्षने रणजी ट्रॉफीच्या सीझनमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम रचला. त्याने ६९ विकेट्स घेत ९० वर्ष जुना विक्रम मोडला. शानदार कामगिरीमुळे हर्ष दुबे रणजी ट्रॉफीमध्ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बनला होता. आयपीएल २०२५ च्या मेगाऑक्शनमध्ये त्याने २० लाख रुपये बेस प्राईजसह सहभाग घेतला होता. पण एकाही संघाने त्याच्यावर बोली लावली नव्हती. पण आता हैदराबादने हर्षला आपल्या ताफ्यात सामील केले आहे.
हर्ष दुबेला क्रिकेटची आवड नव्हती. अनावधानाने घडलेल्या एका घटनेमुळे त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने खुलासा केला होता. तो म्हणाला, 'मला कधीही क्रिकेट खेळायचे नव्हते. एकदा वडिलांनी वह्या-पुस्तकं खरेदी करण्यासाठी मला पैसे दिले होते. पण रस्ता चुकल्याने मी एका स्पोर्ट्स शॉपजवळ पोहोचलो. वडिलांनी दिलेल्या पैशातून क्रिकेटचे साहित्य खेरदी केले. तेव्हापासून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.'
डिसेंबर २०२२ मध्ये हर्ष दुबेने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. १८ फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये त्याने ९४ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने ७०९ धावा केल्या आहेत. तीन वर्षांच्या कारकीर्दीत हर्षने ८ वेळा ५ गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. सात वेळा अर्धशतकीय कामगिरी त्याने केली आहे. २० लिस्ट ए सामन्यांमध्ये २१ विकेट्स आणि २१३ धावा हर्ष दुबेने केल्या आहेत. तर टी-२० फॉरमॅटमध्ये १६ सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.