
Jasprit Bumrah News : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपदाची सोपवण्यात आली होती. पहिला कसोटी सामना टीम इंडियाने जिंकला. त्यानंतर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला पोहोचला आणि त्याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले. पुढील २-३ सामन्यांमध्ये खराब खेळी केल्यानंतर पाचव्या सामन्यातून रोहित स्वत: बाहेर पडला. तेव्हा बुमराहकडे पुन्हा नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आले. बुमराहच्या नेतृत्त्वामध्ये भारताने चांगली कामगिरी केल्याने आता इंग्लंड दौऱ्यावर तो कर्णधार असेल अशा चर्चा रंगल्या होत्या.
बीसीसीआयने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंड दौऱ्यावर जसप्रीत बुमराहकडे नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार नाही अशी माहिती समोर आली आहे. कर्णधारपद तर नाहीच, पण बुमराहला उपकर्णधारपदावरुन काढण्याचा विचार असल्याचे म्हटले जात आहे. आयपीएल २०२५ संपल्यानंतर लगेच भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वीच निवड समितीला बुमराहच्या कामाच्या भाराचे नियोजन करायचे आहे. बुमराह पाचही सामने खेळेल याची हमी नसल्याने उपकर्णधारपद सतत बदलण्याची आमची इच्छा नाही. तेव्हा जो खेळाडू मालिकेतील ५ सामने खेळेल त्याच्याकडे उपकर्णधारपद दिले जाईल अशी भूमिका निवड समिती आहे. शुबमन गिल किंवा रिषभ पंत यांच्यापैकी एकाला उपकर्णधारपद दिले जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
भारतीय संघ जून महिन्यामध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाईल. दौऱ्यातील कसोटी सामन्यांची सुरुवात २० जूनपासून होणार आहे. शेवटचा कसोटी सामना ३१ जुलै रोजी खेळला जाईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकला नव्हता. तेव्हा बुमराहवर गोलंदाजी व्यतिरिक्त आणखी उपकर्णधारपदाची जबाबदारी द्यायला नको, त्याला अधिक ताण यायला नको अशी विचार निवड समिती करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.