IPL Points Table: पंजाबच्या विजयाने मुंबई इंडियन्सला पॉईंट्स टेबलमध्ये मोठा धक्का; मोठ्या उलटफेरानंतर 'या' टीम्स प्लेऑफमधून बाहेर

IPL 2025 Points Table: रविवारी आयपीएलमध्ये दोन सामने खेळवण्यात आले. या दोन्ही सामन्यांमध्ये केकेआर आणि पंजाब किंग्सचा विजय झाला आहे. या दोन्ही टीम्सच्या विजयामुळे पॉईंट्स टेबलचं गणित बदललं आहे.
IPL Points Table
IPL Points Tablesaam tv
Published On

रविवारी आयपीएलमध्ये पंजाब किंग्सने आयपीएल २०२५ मध्ये लखनऊ सुपर जाएंट्सचा पराभव केला. एलएसजीला या सामन्यात ३७ रन्सने पराभव स्विकारावा लागला. या सामन्यामध्ये पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. या विजयासोबत पंजाबच्या टीमने प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. दरम्यान केकेआर आणि पंजाबच्या विजयानंतर पॉईंट्स टेबलचं गणित बदललं आहे.

आरसीबीची टीम अग्रस्थानी

आरसीबीची टीम आयपीएल २०२५ च्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. आतापर्यंत या टीमने एकूण ११ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ८ सामन्यांमध्ये विजय मिळवणं त्यांना शक्य झाला आहे. एकूण १६ पॉईंट्ससह आरसीबीची टीम पॉईंट्स टेबलच्या पहिल्या स्थानी आहे.

IPL Points Table
KKR Vs RR : रियान परागची वादळी झुंज अपयशी, अटीतटीच्या सामन्यात १ धावेने केकेआरने मारली बाजी

पंजाब किंग्जने मारली मोठी मजल

लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध मिळवलेल्या विजयानंतर पंजाब किंग्सच्या टीमने चौथ्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. टीमने आतापर्यंत ११ सामन्यांमध्ये ७ विजय मिळवले आहेत. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे १५ पॉईंट्ससह ही टीम सध्या दुसऱ्या स्थानावर आहे.

पंजाबच्या विजयाने मुंबईला धक्का

पंजाब किंग्सच्या विजयाने मुंबई इंडियन्सच्या टीमचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. मुंबईची टीम दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. मुंबईनेही ११ सामन्यांपैकी ७ सामन्यांमध्ये विजय मिळवला असून १४ पॉईंट्स त्यांच्या खात्यात आहेत. या टीमचं नेट रन रेट 1.274 आहे. तर गुजरात टायटन्स चौथ्या नंबरवर पोहोचली आहे.

IPL Points Table
श्रेयस अय्यरला आउट करुन आनंद गगनात मावेनासा झाला, अतिउत्साही दिग्वेश राठी पुन्हा नको ती चूक करुन बसला, आता कारवाई?

प्लेऑफच्या रेसमध्ये या टीम्सचा समावेश

गुजरात टायचन्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्स आणि आरसीबी या ४ टीम्स सध्ये प्लेऑफच्या रेसमध्ये पुढे आहेत. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिट्ल, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स या टीम्स देखील प्लेऑफच्या रेसमध्ये आहेत.

IPL Points Table
PBKS Vs LSG : समाद-बडोनी नडले, पण किंग्ससमोर अपुरे पडले; लखनऊवर मात करत पंजाबची झेप, मुंबईला मोठा धक्का...

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या टीम्सच्या प्लेऑफच्या आशा पूर्णपणे मावळल्या आहेत. या दोन्ही टीम्सने यंदाच्या वर्षी फारशी चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे दोन्ही टीम्स प्लेऑफच्या बाहेर गेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com