श्रेयस अय्यरला आउट करुन आनंद गगनात मावेनासा झाला, अतिउत्साही दिग्वेश राठी पुन्हा नको ती चूक करुन बसला, आता कारवाई?

Digvesh Rathi Notebook Celebration : पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यात दिग्वेश राठीने श्रेयस अय्यरला बाद केले. अय्यरची विकेट पडल्यावर राठीने नोटबुक सेलिब्रेशन केले.
Digvesh Rathi Notebook Celebration
Digvesh Rathi Notebook CelebrationX
Published On

PBKS VS LSG IPL 2025 : धर्मशाला स्टेडियमवर आयपीएल २०२५ मधला ५४ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर किंग्स यांच्यात रंगला आहे. या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरला दिग्वेश राठीने बाद केले. अय्यर कॅचआउट झाल्यानंतर दिग्वेश राठीने पुन्हा एकदा नोटबुक सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनमुळे राठीवर कारवाई होईल असे म्हटले जात आहे.

अकराव्या ओव्हरमध्ये दिग्वेश राठी गोलंदाजी करण्यासाठी आला. पहिल्या चेंडूवर श्रेयस अय्यरने जोरदार षटकार मारला. दुसऱ्या चेंडूवर अय्यरने पुन्हा एकदा बॅट फिरवली. पण यावेळेस चेंडू मिड ऑफला असलेल्या मयंक यादवच्या दिशेने गेला. मयंक यादवने कॅच पकडून श्रेयस अय्यरला कॅचआउट केले. त्यानंतर दिग्वेश राठीने नोटबुक सेलिब्रेशन केले. पंजाबचा कॅप्टन अय्यर २५ चेंडूत ४५ धावा करुन माघारी परतला.

Digvesh Rathi Notebook Celebration
6, 6, 6, 6, 6..6... रियान परागकडून केकेआरची धुलाई, मारले सलग सहा षटकार; दोन वर्षांपूर्वीच ट्वीट होतय व्हायरल

पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या विरोधात खेळताना दिग्वेश राठीने नोटबुक सेलिब्रेशन केले होते. या सेलिब्रेशनमुळे राठीवर बीसीसीआयने कारवाई केली होती. त्यानंतर राठीने हातावर नोटबुक सेलिब्रेशन करण्याऐवजी जमिनीवर काहीतरी लिहून सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. आजच्या सामन्यात दिग्वेश राठीने पुन्हा हातवारे करत नोटबुक सेलिब्रेशन केले आहे. आता यामुळे राठीला मानधनातील रक्कम दंड म्हणून भरावी लागेल किंवा त्याच्यावर एका सामन्याची बंदी येईल अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Digvesh Rathi Notebook Celebration
Virat Kohli : आरसीबीने सामना जिंकला, ऑरेंज कॅप मिळवूनही विराट उदास दिसला; नेटकऱ्यांनी अवनीत कौरशी लावलं कनेक्शन

लखनऊ सुपर जायंट्सची प्लेईंग ११ -

निकोलस पूरन, डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, रिषभ पंत (कर्णधार), आयुष बडोनी, अब्दुल समद, आकाश सिंग, आवेश खान, मयंक यादव, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी

इम्पॅक्टचे पर्याय - रवी बिश्नोई, मिशेल मार्श, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रीट्झके, शाहबाज अहमद

पंजाब किंग्सची प्लेईंग ११ -

प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस, शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टॉयनिस, अजमातुल्ला ओमरझाई, मार्को यान्सिन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग

इम्पॅक्टचे पर्याय - विजयकुमार वैशाख, हरप्रीत ब्रार, प्रवीण दुबे, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट

Digvesh Rathi Notebook Celebration
Kagiso Rabada : अंमली पदार्थांचे सेवन करुनही IPL 2025 मध्ये कागिसो रबाडा करणार कमबॅक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com