PBKS Vs LSG : समाद-बडोनी नडले, पण किंग्ससमोर अपुरे पडले; लखनऊवर मात करत पंजाबची झेप, मुंबईला मोठा धक्का...

PBKS Vs LSG IPL 2025 : पंजाब आणि लखनऊच्या लढतीत पंजाब किंग्सचा ३७ धावांनी विजय झाला आहे. पंजाब किंग्सने दिलेल्या २३७ धावांचे लक्ष्य गाठताना लखनऊ सुपर जायंट्सच्या शिलेदारांनी १९९ धावा केल्या.
PBKS Vs LSG
PBKS Vs LSGX
Published On

IPL 2025 मधल्या ५४ व्या सामन्यात पंजाब आणि लखनऊ हे दोन संघ आमनेसामने आले. पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यामध्ये पंजाबचा ३७ धावांनी विजय झाला आहे. तर लखनऊच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनऊचा कर्णधार रिषभ पंतने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंजाबचे फलंदाज मैदानात उतरले. पंजाब किंग्सने २० ओव्हर्समध्ये २३६ धावा केल्या. तर लखनऊने १९९ धावा केल्या. या विजयानंतर पंजाबने पॉईंट्स टेबलवर मोठी झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे. यामुळे मुंबईचा संघ तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

सलामीसाठी आलेला प्रियांश आर्य फक्त १ धाव करुन माघारी परतला. प्रभसिमरन सिंहने मोर्चा सांभाळला. तिसऱ्या क्रमावर आलेल्या जॉश इंग्लिसने झटपट ३० धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर ४५ धावांवर बाद झाला. नेहाल वढेराने १६ धावा, तर मार्कस स्टॉयनिसने १५ धावा केल्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये शशांक सिंहने २२० च्या स्ट्राईक रेटने ३३ धावा केल्या. सलामीसाठी आलेला प्रभसिमरन सिंह १९ व्या ओव्हरपर्यंत क्रीझवर टिकून राहिला. त्याने शानदार फलंदाजी करताना ९१ धावा केल्या.

PBKS Vs LSG
Kagiso Rabada : अंमली पदार्थांचे सेवन करुनही IPL 2025 मध्ये कागिसो रबाडा करणार कमबॅक

२३७ धावांचे लक्ष्य गाठताना मिचेल मार्श आणि एडन मार्कराम सलामीला आले. तिसऱ्या ओव्हरमध्ये मिचेल मार्श शून्यावर, तर एडन मार्कराम १३ धावांवर बाद झाला. पाचव्या ओव्हरमध्ये निकोलस पूरन फक्त ६ धावा करुन माघारी परतला. या तिन्हीही विकेट्स अर्शदीप सिंहने घेतल्या. रिषभ पंतचा पुन्हा फ्लोप शो पाहायला मिळाला. त्याने १७ चेंडूत १८ धावा करुन बाद झाला. लगेच पुढच्या ओव्हरमध्ये डेव्हिड मिलरही कॅचआउट झाला. अब्दुल समद आणि आयुष बडोनी यांनी भागीदारी करत लखनऊचा डाव पुढे नेला. ४५ धावांवर समद कॅचआउट झाला. आयुष बडोनीने अर्धशतकीय खेळी केली.

PBKS Vs LSG
श्रेयस अय्यरला आउट करुन आनंद गगनात मावेनासा झाला, अतिउत्साही दिग्वेश राठी पुन्हा नको ती चूक करुन बसला, आता कारवाई?

लखनऊ सुपर जायंट्सची प्लेईंग ११ -

निकोलस पूरन, डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, रिषभ पंत (कर्णधार), आयुष बडोनी, अब्दुल समद, आकाश सिंग, आवेश खान, मयंक यादव, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी

इम्पॅक्टचे पर्याय - रवी बिश्नोई, मिचेल मार्श, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रीट्झके, शाहबाज अहमद

पंजाब किंग्सची प्लेईंग ११ -

प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), जोश इंग्लिस, शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टॉयनिस, अजमातुल्ला ओमरझाई, मार्को यान्सिन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग

इम्पॅक्टचे पर्याय - विजयकुमार वैशाख, हरप्रीत ब्रार, प्रवीण दुबे, सूर्यांश शेडगे, झेवियर बार्टलेट

PBKS Vs LSG
6, 6, 6, 6, 6..6... रियान परागकडून केकेआरची धुलाई, मारले सलग सहा षटकार; दोन वर्षांपूर्वीच ट्वीट होतय व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com