CSK VS LSG: Canva
क्रीडा

CSK VS LSG: सीएसकेने सामना कुठे गमावला? ऋतुराज गायकवाडने सांगितलं कारण

IPL 2024: लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना उत्तर प्रदेशमधील अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमध्ये रंगला. या सामन्यात लखनऊच्या संघाने चेन्नई सुपरकिंग्सचा ८ विकेट्सने पराभव केला. या सामन्यामधील पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड काहीसा निराश झालेला दिसला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शुक्रवारी लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना उत्तर प्रदेशमधील अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमध्ये रंगला. या सामन्यात लखनऊच्या संघाने चेन्नई सुपरकिंग्सचा ८ विकेट्सने पराभव केला. कर्णधार के.एल.राहुल आणि क्विंटन डी कॉकच्या धमाकेदार अर्धशतकीय खेळीमुळे सुपरजायंट्सने हा सामना जिंकला. या विजयानंतर लखनऊचा संघ गुणतालिकेत ५ व्या क्रमावर आला आहे. या सामन्यामधील पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड काहीसा निराश झालेला दिसला.

लखनऊच्या संघाने टॉस जिंकला आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यात प्रथम फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्स संघाने १७६ धावा केल्या. लखनऊच्या संघाने १७७ धावांचा पाठलाग करत ६ चेंडू बाकी असताना २ गडी गमवत १८० धावा करून विजयी मिळवला. या सामन्यामध्ये कर्णधार के. एल राहुल याने ८२ धावा तर क्विंटन डी कॉकने ५४ धावांची दमदार खेळी खेळली. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी १३४ धावांची पार्टनरशिप केली.

गुणतालिकेत पाचव्या स्थानावर :

आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत लखनऊ सुपरजायंट्सने एकुण ७ सामने खेळले आहेत. त्यामधील ४ सामने जिंकले आहेत. चेन्न्ईच्या सामन्यात या सामन्यामध्ये ८ गडी राखून गुणतालिकेत ८ गुणांसह लखनऊचा संघ ५व्या क्रमांकावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्सचा आतापर्यंत या हंगामातील ७ सामने खेळले आहेत. त्यामधील ४ सामने जिंकत ८ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

पराभवाचे मुख्य कारण काय?

शुक्रवारी लखनऊ विरूद्ध झालेल्या सामन्यातील पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला, ' ज्या स्थितीमध्ये सामना झाला त्यासा बघता आमच्या संघाने चांगली फलंदाजी केली, मात्र पॉवरप्लेनंतर आमच्या संघाला चांगला फायदा घेता आला नाही. आमच्या संघाची गडी बाद होत राहिले ज्यामुळे पुढील खेळूडूंवर दबाव बनत गेला. या खेळपट्टीवर १९० धावा बनवले आसते तर आमच्या संघासाठी अधिक चांगले झाले असते. मात्रा या सामन्यामध्ये चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने जबरदस्त अर्धशतक झळकावले, तर कॅप्टन कुल म्हणून ओळखला जाणाऱ्या धोनीने ९ चेंडूत २८ धावांची खेळी केली. सामना दरम्यान चेन्नईच्या क्षेत्ररक्षकांनी मैदानात ज्याप्रकारे कॅच सोडले ते या सामन्याच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोपरी पाचपाखाडीत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकत्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT