MS Dhoni IPL Retirement : चेन्नई सुपर किंग्स आज चॅम्पियन बनल्यास धोनी निवृत्ती जाहीर करणार? वाचा सविस्तर

MS Dhoni IPL Retirement : खेळाच्या कारकिर्दीचे काय करायचे याचा विचार करण्यासाठी त्याच्याकडे अजून 8 ते 9 महिने आहेत, असं धोनीने म्हटलं होतं.
MS Dhoni
MS Dhoni Saam TV

MS Dhoni IPL Retirement : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी IPL इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. महेंद्र सिंह धोनीने त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने चार वेळा जेतेपत पटकावलं आहे. मुंबईने पाच वेळा जरी आयपीएलचं जेतपद पटकावलं असलं तरी धोनीच्या नेतृ्त्वातील चेन्नईच्या कामगिरीत कमालीचं सातत्य आहे.

धोनची आयपीएलमधील लोकप्रियतेची त्याच्या मैदानातील उपस्थितीदरम्यान दिसून येते. धोनी मैदानात आला की मैदानात धोनी... धोनी... असा आवाज घुमतो. धोनीचे असेही फॅन्स आहेत जे त्याची एक झलक पाहण्यासाठी मैदानात सामना पाहण्यासाठी येतात. मात्र मागील दोन-तीन वर्षांपासून धोनीच्या कामगिरीपेक्षा त्याच्या निवृत्तीचा चर्चा रंगत आहे.

आज आयपीएल 2023 चा अंतिम सामना  गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्समध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी पुन्हा एकदा धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगू लागली आहे. एकीकडे या सीजनचा चॅम्पियन कोण याचा निकाल लागणार आहे. तर दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीचा हा फेअरवेल सामना ठरू का शकतो याबद्दल चर्चा सुरु आहे.

MS Dhoni
IPL 2023 Final, CSK vs GJ : दुर्मिळ योग! धोनी-पांड्याने कमालच केली; आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार

चेन्नईने जेतेपद पटकावलं तर..

महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई 10व्यांदा आयपीएलची फायनल खेळणार आहे. आजचा फायनल सामना जिंकल्यास चेन्नई पाचव्यांदा चॅम्पियन बनेल. असं झाल्यात सर्वाधिक जेतेपद पटकावलेल्या संघामध्ये चेन्नई आणि मुंबई अव्वल स्थानी असतील. चॅम्पियन बनून निवृ्त्त व्हावं असं कोणत्याही यशस्वी कर्णधाराचं स्वप्न असतं. त्यामुळे जर चेन्नईने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं तर धोनी निवृत्तीचा निर्णय जाहीर करु शकतो.

धोनीचं वाढतं वय

महेंद्र सिंह धोनी सध्या 41 वर्षांचा आहे. पुढील आयपीएल खेळताना धोनीचं वय 42 वर्ष असेल. मात्र वाढत्या वयामुळे धोनीच्या फिटनेसवरही परिणाम होऊ शकतो. यंदाच्या सीजनच्या सुरुवातीला धोनी गुडघ्याच्या समस्येने त्रस्त दिसत होता. सुरुवातीच्या अनेक सामन्यामध्ये तो खूप अस्वस्थ होताना दिसत होता. त्यामुळे वाढत्या वयाची विचार करुन धोनी आपल्या निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतो. (Latest sports updates)

MS Dhoni
Mohit Sharma Story : 6 कोटीच्या प्लेअरवर 50 लाखात खेळण्याची वेळ आली! Mohit Sharma चं सॉलिड कमबॅक

निवृत्तीबाबत धोनी म्हणाला...

चेन्नई सुपर किंग्जने क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्सचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला होता. सामना संपल्यानंतर धोनीला त्याच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना धोनीने म्हटलं की, खेळाच्या कारकिर्दीचे काय करायचे याचा विचार करण्यासाठी त्याच्याकडे अजून 8 ते 9 महिने आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com