IPL 2023 Final, CSK vs GT : दुर्मिळ योग! धोनी-पांड्याने कमालच केली; आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार

IPL 2023 Final, CSK vs GT : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा अंतिम सामना सुरू होईल.
IPL 2023 Match 1 GT VS CSK
IPL 2023 Match 1 GT VS CSKTwitter
Published On

IPL 2023 Final, CSK vs GJ : आयपीएलच्या 16 व्या हंगामातील चॅम्पियन आज ठरणार आहे. विजेतेपदासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स हे दोन संघ एकमेकांशी भिडणार आहे.  गुजरात टायटन्स गतविजेतेपद कायम राखणार की चेन्नई पाचव्यांदा विजेतेपद पटकावणार, हे आज स्पष्ट होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा अंतिम सामना सुरू होईल.

पहिला सामन्यात खेळलेले संघ फायनलमध्ये

आयपीएलच्या इतिहासात एक दुर्मिळ योगायोग घडला आहे, जो आजपर्यंत घडला नव्हता. आयपीएलच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे, की ज्या संघांनी पहिला सामना खेळला होता तेच संघ अंतिम सामना खेळणार आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नई आणि गुजरात यांच्यात 31 मार्च रोजी अहमदाबादमध्ये खेळला गेला होता. गुजरातने तो सामना ५ विकेटने जिंकला होता.

IPL 2023 Match 1 GT VS CSK
Hardik Pandya: गिल, शमी नव्हे तर 'हा' आहे गुजरातचा मॅचविनर खेळाडू! स्वतः हार्दिकने केलं कौतुक

आयपीएलमध्ये 5 वेळा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2013, 2015, 2017, 2019, 2020 साली आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. चेन्नईने धोनीच्या नेतृत्वाखाली 4 वेळा 2010, 2011, 2018, 2021 साली विजेतेपद पटकावलं आहे.

त्यानंतर हैदराबादने फ्रॅन्चाईजीने दोनदा डेक्कन चार्जर्सने 2009, सनरायझर्स हैदराबादने 2016 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं.कोलकाता नाइट रायडर्स दोनदा (2012, 2014) चॅम्पियन बनले. या व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्स (2008) आणि हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स (2022) यांनी 1-1 वेळा विजेतेपद पटकावले आहे. (Latest sports updates)

IPL 2023 Match 1 GT VS CSK
Mohit Sharma Story : 6 कोटीच्या प्लेअरवर 50 लाखात खेळण्याची वेळ आली! Mohit Sharma चं सॉलिड कमबॅक

पहिला सामना आणि अंतिम सामना कनेक्शन

>> फक्त 5 वेळा (2011, 2014, 2015, 2018, 2020) पहिला सामना खेळणारा संघ चॅम्पियन बनला आहे.

>> फक्त 3 वेळा (2011, 2014, 2018) पहिला सामना जिंकणारा संघ चॅम्पियन झाला

>> फक्त 2 वेळा (2015) , 2020) सामना हरलेला संघ चॅम्पियन ठरला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com