LSG vs DC, Head To Head Record: आज लखनऊ- दिल्ली आमने सामने; कोणाचं पारडं जड?

LSG vs DC Record News: आयपीएल २०२४ स्पर्धेतील २६ वा दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.
LSG vs DC Head to head record ipl 2024 lucknow super giants vs delhi capitals head to head record news amd2000
LSG vs DC Head to head record ipl 2024 lucknow super giants vs delhi capitals head to head record news amd2000twitter

LSG vs DC, IPL 2024 Head To Head Record:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २६ वा दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर पार पडणार आहे. या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. दिल्लीचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे. तर लखनऊचा संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. दरम्यान कसा राहिलाय या दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड..

दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपरजायंट्स हे दोन्ही संघ आतापर्यंत ३ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान तिन्ही सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे दिल्लीविरुद्ध खेळताना लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या विजयाची सरासरी १०० टक्के आहे. हा रेकॉर्ड पाहता लखनऊचा संघ यावेळीही दिल्लीवर भारी पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा संघ या स्पर्धेतील दुसरा आणि लखनऊविरुद्ध आपला पहिला विजय मिळवण्यासाठी पूर्ण जोर लावताना दिसून येऊ शकतो. (Cricket news in marathi)

LSG vs DC Head to head record ipl 2024 lucknow super giants vs delhi capitals head to head record news amd2000
MI vs RCB, IPL 2024: बुमराहच्या गोलंदाजीवर किंग कोहलीची बत्ती गुल ! इशानचा भन्नाट कॅच, पाहा Video

गेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने ३३ धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने १६४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरातचा डाव १३० धावांवर आटोपला.

LSG vs DC Head to head record ipl 2024 lucknow super giants vs delhi capitals head to head record news amd2000
Jasprit Bumrah Record: नाद करा पण बुमराहचा कुठं! RCB विरुद्ध असा कारनामा करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज

लखनऊने मागचा सामना जिंकला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघाला गेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला २९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com