आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स णि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची जादू पाहायला मिळाली. दरम्यान धावांचा बचाव करत असताना जसप्रीत बुमराहला असा काही चेंडू टाकला. ज्यावर फलंदाज आश्चर्यचकीत होऊन त्रिफळाचीत झाला. बुमराहने टाकलेल्या या यॉर्कर चेंडूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जसप्रीत बुमराहचा यॉर्कर चेंडू आणि बंदुकीची गोळी यात बरच साम्य आहे. कारण जसप्रीत बुमराहचा चेंडू देखील डायरेक्ट आपल्या टार्गेटवर जाऊन लागतो. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र बुमराहने सुरुवातीलाच पंजाबला मोठे धक्के दिले.
त्याने यॉर्कर चेंडू टाकत रका रुसोला बाद करत माघारी धाडलं. तो इथेच थांबला नाही तर त्याने षटकातील शेवटच्या चेंडूवर पंजाबचा कर्णधार सॅम करनला बाद करत माघारी धाडलं. बुमराहने त्याला इशान किशनच्या हातून झेलबाद करत माघारी धाडलं. त्याने आपल्या पहिल्या षटकात २ धावा खर्च करत अवघे २ गडी बाद केले.
पंजाबला हा सामना जिंकण्यासाठी १९२ धावांची गरज होती. मात्र सुरुवातीलाच जसप्रीत बुमराहने पंजाबला मोठे धक्के दिले. पहिल्याच षटकात गेराल्ड कोएत्जीने प्रभसिमरन सिंगला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर दुसऱ्याच षटकात बुमराहने शानदार गोलंदाजी केली. त्यानंतर कोएत्जीने लियाम लिविंगस्टला बाद करत माघारी धाडलं.
या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाने अवघ्या १४ धावांवर ४ विकेट्स गमावल्या होत्या. इथपर्यंत सामना मुंबईच्या हातात होता. मात्र त्यानंतर शशांक सिंग आणि आशुतोष शर्मानं संघाचा डाव सांभाळला. दरम्यान शेवटी पंजाब किंग्ज संघाला हा सामना ९ धावांनी गमवावा लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.