PBKS vs MI, IPL 2024: मुंबई-पंजाब सामन्यातील 'तो' व्हिडिओ आला समोर!, सोशल मीडियात इतकी जोरदार चर्चा का रंगलीय?

Mumbai Indians Viral Video: या सामन्यात असं काही घडलं जे अस्वीकार्य आहे. मुंबई इंडियन्स संघाने DRS घेतल्यानंतर पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार सॅम करनने आक्षेप घेतला होता. मात्र अंपायरने त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही.
punjab kings vs mumbai indians drs controversy sam curran tim david watch video amd2000
punjab kings vs mumbai indians drs controversy sam curran tim david watch video amd2000twitter

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ३३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने शानदार कामगिरी करत पंजाब किंग्ज संघावर ९ धावांनी विजय मिळवला आहे. दरम्यान या सामन्यात असं काही घडलं जे अस्वीकार्य आहे, असं बोललं जातं. सोशल मीडियावरही व्हायरल झालेल्या व्हिडिओत नेटकऱ्यांकडून तसा दावा केला जात आहे. मुंबई इंडियन्स संघाने DRS घेतल्यानंतर पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार सॅम करनने आक्षेप घेतला होता. मात्र अंपायरने त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, असं या व्हिडिओतून सांगण्यात येत आहे.

तर झाले असे की, मुंबई इंडियन्स संघाची फलंदाजी सुरु असताना पंजाब किंग्ज संघाकडून अर्शदीप सिंग १५ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. या षटकातील शेवटचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने बाहेर टाकला. त्यावेळी अंपायरने हा चेंडू वाईड चेंडू घोषित केला नव्हता. त्यानंतर डगआऊटमधून टिम डेव्हिड DRS चा इशारा करतो.

punjab kings vs mumbai indians drs controversy sam curran tim david watch video amd2000
Hardik Pandya Statement: 'IPL मध्ये हे होतच..' पंजाबला धूळ चारल्यानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

अर्शदीपने ऑफ साईडच्या दिशेने यॉर्कर चेंडू टाकला होता. त्यावेळी फलंदाजी करत असलेल्या सूर्यकुमार यादव षटक संपलय असं समजून नॉन स्ट्राईकला जात असतो. नेमकं त्याचवेळी कॅमेरा मुंबई इंडियन्स संघाच्या डगआऊटकडे फिरवला जातो. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मार्क बाऊचर टीव्हीमध्ये रिप्ले पाहतो आणि त्याच्या निदर्शनास येतं की हा वाईड चेंडू आहे. कॅमेऱ्यापासून लपून टिम डेव्हिड त्याला DRS घेण्याचा इशारा करतो. मात्र त्याची चोरी पकडली जाते.

टिम डेव्हिडने DRS चा इशारा केल्यानंतर सॅम करन अंपायरसोबत चर्चा करण्यासाठी जात असतो. मात्र अंपायर त्याचं काहीच ऐकून घेत नाही. शेवटी अंपायर DRS चा इशारा करतात. DRS मध्ये हा चेंडू वाईड असल्याचं दिसून येतं. त्यामुळे अंपायरला आपला निर्णय बदलावा लागतो. टिम डेव्हिड आणि मुंबई इंडियन्सने जे केलं ते चुकीचं आहे,अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगायला सुरुवात झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com