rohit sharma twitter
Sports

Team India Celebration: वर्ल्डकप ट्रॉफी, खेळाडू आणि ओपन बस टूर; टीम इंडियाचा मुंबईत जल्लोष? असा असेल प्लान!

T20 World Cup Celebration In Mumbai: भारतीय संघाने दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

Ankush Dhavre

बारबाडोसच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार पार पडला. १७ वर्षांनंतर चालून आलेल्या संधीचा भारतीय संघाने दोन्ही हातांनी स्वीकार केला. फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी विजय मिळवला आणि दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. या विजयानंतर बारबाडोसमध्ये सेलिब्रेशन झालं. ही तर सुरुवात होती. कारण वर्ल्डकप विजयाचं जंगी सेलिब्रेशन तर भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर होणार आहे.

मुंबईत निघणार ओपन बस रॅली

भारतीय खेळाडू अजूनही बारबाडोसमध्येच आहेत. बारबाडोसमध्ये चक्रीवादळामुळे सर्वच ठप्प पडलं आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू मायदेशात येण्यासाठी अजून निघालेले नाहीत. बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानाची सोप केली होती. मात्र खराब वातावरणामुळे भारतीय खेळाडूंना थांबावं लागलं आहे. भारतीय संघ बुधवारी (३ जून) भारतात दाखल होणार होता. मात्र आता आणखी उशीर होऊ शकतो. दरम्यान भारतात आल्यानंतर भारतीय संघाची वर्ल्डकप ट्रॉफीसोबत रॅली काढली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, भारतात आल्यानंतर भारतीय खेळाडू दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर मुंबईत ओपन बस रॅलीचे आयोजन केले जाणार आहे. या रॅलीत भारतीय संघातील सर्व खेळाडू सहभाग घेतील आणि फॅन्सचे आभार मानताना दिसून येतील. मात्र ही रॅली कधी काढली जाणार याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही. यापूर्वी २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी भारताचा संघ भारतात परतल्यानंतर मुंबईत रॅली काढण्यात आली होती.

भारतात येण्यास का होतोय उशीर?

भारतीय संघाचा फानयलचा सामना २९ जून रोजी पार पडला. या सामन्यानंतर भारतीय संघातील खेळाडू १ जूलै रोजी भारतात येण्यासाठी रवाना होणार होते. मात्र चक्रीवादळामुळे हा प्लान पुढे ढकलला गेला. त्यानंतर बीसीसीआयने चार्टर्ड विमानाची सोय केली होती. मात्र परिस्थिती अनुकूल नसल्याने हा प्लान देखील पुढे ढकलण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

Fact Check: बाजारात ५५० रूपयांचं कॉईन? १०० आणि ७५ रुपयांचंही कॉईन येणार?

Accident: मुंबईत अपघाताचा थरार! हायवेवर रेस लावणं पडलं महागात, महागड्या पोर्शे कारचा चुराडा; पाहा VIDEO

Besan Ladoo Recipe : ना कडक ना जास्त चिकट; 'असे' बनवा परफेक्ट खमंग बेसनाचे लाडू

Arbaaz Khan Daughter Name : खान कुटुंबात आली प्रिंसेस, अरबाज-शूराने ठेवलं लेकीचं खास नाव

SCROLL FOR NEXT