Shreya Maskar
खरबूज ज्यूस बनवण्यासाठी खरबूज, दूध, ड्रायफ्रूट्स आणि साखर इत्यादी साहित्य लागते. खरबूज जास्त पिकलेला किंवा जास्त कच्चा नसावा.
खरबूज ज्यूस बनवण्यासाठी सर्वप्रथम खरबूज सोलून त्यातील बिया काढून घ्या. जेणेकरून ज्यूसची चव आणखी वाढेल.
त्यानंतर खरबूजातील गर बाहेर काढा. आता यात दूध, साखर टाकून मिश्रण एकजीव करा. दुधाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार टाका.
तयार मिश्रण गाळणीने गाळून घ्या. गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर यात बर्फाचे तुकडे टाका.
शेवटी थंडगार खरबूज ज्यूस काचेच्या ग्लासात काढा आणि त्यात ड्रायफ्रूट्स टाका. तुम्हाला आवडत असतील तर बिया देखील टाकू शकता. अशाप्रकारे खरबूज ज्यूसचा आस्वाद घ्या.
हिवाळा, उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी खरबूज ज्यूस नक्की प्या. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते. शरीराचे तापमान नियंत्रित करते.
खरबूजमधील व्हिटॅमिन A आणि C मुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहते. पिंपल्स, काळे डाग आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
खरबूजमध्ये कॅलरी कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने वजन कमी राहण्यास मदत होते. त्यामुळे नाश्त्यात याचा समावेश नक्की करा.