Accident : शेतात कामासाठी निघाले,पण वाटेतच काळाचा घाला; पुण्यात भीषण अपघातात नवरा-बायकोचा मृत्यू

Chakan Accident News : पुणे जिल्ह्यातील चाकण-तळेगाव रस्त्यावर ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. भांबोली गावातील मनोहर आणि गीता मेंगाळे यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला.
accident
accident Saam tv
Published On

Chakan Talegaon road accident details : ट्रकनं दुचाकीला जोरात धडक दिल्याने झालेल्‍या भीषण अपघातात (Road Accident) पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. हे मृत दाम्पत्य खेड तालुक्यातील भांबोली येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा अपघात चाकण-तळेगाव रोडवर (Chakan-Talegaon Road) झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये मनोहर शिवराम मेंगाळे (वय ३६) आणि गीता मनोहर मेंगाळे (वय ३४) यांचा मृत्यू झाला आहे. हे दाम्पत्य खेडमधील भांबोली (Bhamboli, Khed) येथील रहिवासी आहेत.

म्हाळुंगे पोलिसांनी (Mhalunge Police) याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे (Rash and Negligent Driving) गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा अपघातच आहे की घातपात, या दृष्टीनेही पोलिसांकडून तपास (Police Investigation) केला जात आहे. पोलीस अधिकारी दिगंबर सूर्यवंशी यांनी माहिती दिली की, मनोहर मेंगाळे हे दुचाकी (Two-wheeler) चालवत होते, तर गीता मागे बसल्या होत्या. हे दाम्पत्य शेतावर कामासाठी जाण्यासाठी भांबोली गावातील चौकातून रस्ता ओलांडत असताना हा काळ बनून आलेला ट्रक (Speeding Truck) धडकला.

accident
सॉफ्टवेअर इंजिनिअर हार्दिकने बहिणीवर ४० वार केले, आईलाही सोडले नाही; हत्येमागचं डोकं सुन्न करणारं कारण समोर...

भांबोली गावातून जाणारा चाकण तळेगाव या रस्त्याला डिव्हायडर नाहीत, हा रस्ता मोकळाच आहे. दुचाकी चौकाच्या मध्यभागी पोहोचताच ट्रकने जोरात धडक दिली. ट्रक चाकणहून तळेगावकडे जात असताना दुचाकीला धडकला. या अपघातात पती-पत्नीच्या डोक्याला, चेहऱ्याला, हाताला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. ट्रक चालकाने घटनास्थळी रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष केले आणि दुचाकीही पाहिली नाही, असा आम्हाला संशय आहे. त्या पद्धतीने तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

accident
Kolhapur : कोल्हापूर सुन्न! जंगलात आढळला निवस्त्र मृतदेह, चेहरा-मानेवर वार अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com