indian hockey team twitter
Sports

Paris Olympics: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाचा पूल 'बी'मध्ये समावेश! गोल्ड मेडलिस्ट अर्जेंटिनासह या बलाढ्य संघांचाही समावेश

Indian Hockey Team News: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये होणाऱ्या हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाला पूल बीमध्ये ठेवण्यात आलं आहे.

Ankush Dhavre

Indian Hockey News In Marathi:

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये होणाऱ्या हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाला पूल बीमध्ये ठेवण्यात आलं आहे. ८ वेळच्या भारतीय संघाला आव्हान देण्यासाठी मजबूत संघांचा पूल बी मध्ये समावेश करण्यात आला आहे. पूल बी मध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियम, बलाढ्य ऑस्ट्रेलिया, रियो ऑलिम्पिकचा सुवर्ण पदकविजेता अर्जेंटिना, न्यूझीलंड आणि आयर्लंड या संघांचा समावेश आहे. तर पाकिस्तानचा संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला नाही.

एशियन चॅम्पियन्स आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता भारतीय संघाला पूल बी मध्ये ठेवण्यात आलं आहे. भारतीय संघाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घालत ४१ वर्षांची प्रतीक्षा संपवली होती. भारतीय संघासाठी हे आव्हान मुळीच सोपं नसणार आहे. कारण भारतीय संघाला आव्हान देण्यासाठी बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड आणि आयर्लंडसारख्या संघांचा समावेश आहे. (Hockey News In Marathi)

महिला संघाला नाही मिळालं स्थान..

भारतीय महिला संघालाही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्याची संधी होती. मात्र रांचीमध्ये पार पडलेल्या पात्रता फेरीतील सामन्यांमध्ये भारतीय महिला संघ चौथ्या स्थानी राहिल्याने, पॅरिस ऑलिम्पिकचं तिकीट हुकलं आहे. निर्णायक सामन्यात भारतीय संघाला जपानकडून पराभवाचा सामना करावा लागला.

पाकिस्तानचा संघ बाहेर..

पाकिस्तानचा संघ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. पाकिस्तानचा संघ ओमानमध्ये पार पडलेल्या एफआयएच पात्रता फेरीतील सामन्यात न्यूझोलंडकडून २-३ ने पराभूत झाला. त्यामुळे या पाकिस्तानला या स्पर्धेचं तिकीट मिळालेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

SCROLL FOR NEXT