Tokyo Olympics: नीरज चोप्राने सांगितला फायनलच्या अगोदर घडलेला किस्सा

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. भारताला 121 वर्षांनंतर अॅथलेटिक्समध्ये पदक मिळाले.
Tokyo Olympics: नीरज चोप्राने सांगितला 
फायनलच्या अगोदर घडलेला किस्सा
Tokyo Olympics: नीरज चोप्राने सांगितला फायनलच्या अगोदर घडलेला किस्साSaam Tv

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. भारताला 121 वर्षांनंतर अॅथलेटिक्समध्ये पदक मिळाले. यापूर्वी, नॉर्मन प्रीचार्डने पॅरिस 1900 च्या ऑलिम्पिकमध्ये दोन रौप्यपदके जिंकली होती. त्यानंतर नॉर्मनने पुरुषांच्या 200 मीटर आणि पुरुषांच्या 200 मीटर हर्डलमध्ये रौप्य पदके जिंकली होती. नीरजने भालाफेकच्या अंतिम फेरीत 87.58 दूर भाला फेकून भारताला सुवर्ण मिळवून दिले. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अंतिम सामन्यापूर्वी त्याला आपला भाला मिळत नव्हता. त्याचा भाला पाकिस्तानच्या अर्शद नदीमसोबत घेतला होता. संपूर्ण प्रकरण काय आहे, जाणून घेऊयात.

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत नीरज म्हणाला, 'मी फायनल सुरू होण्यापूर्वी माझ्या भाल्याचा शोध घेत होतो. मी सगळीकडे पाहिले मला तो कुठेही सापडले नाही. अचानक माझी नजर अर्शद नदीमवर पडली. तो माझा भाला घेऊन फिरत होता. मी त्याला म्हणालो, 'भाई, हा माझा भाला आहे. मला दे. मग त्याने ते मला परत दिले. तेव्हाच तुमच्या लक्षात आले असेल की मी माझा पहिला भाला घाईत टाकला होता.

निरज पुढे म्हणाला '' अर्शदने क्वालिफाईंग राउंडमध्ये चांगले प्रदर्शन केले होते. त्याने अंतिम लढाईमध्येही चांगली कामगिरी केली होती. मला चांगले वाटले की पाकिस्तानकडे भालाफेकमध्ये रुची दाखवणारा कोणी तरी आहे. अर्शद भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करेल. नीरजने पाकिस्तानच्या लोकांना अर्शदला सपोर्ट करणयाची विनंती केली आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com