Indian cricket team in Barbados x
Sports

Team India: बार्बाडोसमध्ये अडकलेली टीम इंडिया आज येणार मायदेशी? का अडकले होते खेळाडू?

Indian cricket team in Barbados : प्रत्येक भारतीय टीम इंडिया मायदेशी परतण्याची वाट पाहत आहे. मात्र बार्बाडोसमध्ये टीम इंडियावर नवं संकट कोसळलंय. या अस्मानी संकटामुळे भारतीय खेळाडूंनी भारतात येता येत नाहीये, दरम्यान भारतीय खेळाडू कधी परतणार याची नवी अपडेट समोर आलीय.

Bharat Jadhav

टी२० विश्वचषकाच्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने 29 जून 2024 रोजी विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. या स्पर्धेचा अंतिम सामना बार्बाडोस येथे झाला. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देश आपल्या टीमचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. पण भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्येच अडकून पडलाय.

भारतीय संघातील खेळाडूं आणि स्टाफ बार्बाडोसमधील हॉटेलमध्ये अडकलाय. याचे कारण म्हणजे बार्बाडोसला धडकणारे बेरील चक्रीवादळ. हे वादळामुळे तेथील सर्व उड्डाणांवर परिणाम झालाय. वादळाने बार्बाडोस आणि आसपासच्या भागात चक्रीवादळाने हाहाकार माजवलाय. या वादळामुळेच टीम इंडिया अजून मायदेशी परत येऊ शकली नाहीये.

दरम्यान याबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय. भारतीय क्रिकेटर्स आणि स्टाफ लवकरच मायदेशी येणार आहे. तेथील बेरील चक्रीवादळ बार्बाडोसमधून गेले असून तेथील जनजीवन हळूहळू रुळावर येऊ लागले आहे. लवकरच विमानतळांवरही काम सुरू होईल. तसेच उड्डाणे सुरू होतील. त्यामुळेच भारतीय संघ लवकरच चार्टर्ड विमानाने मायदेशी दाखल होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघ आज बुधवारी (3 जूलै) रात्री 8 च्या सुमारास दिल्लीला पोहोचणार असल्याचं म्हटलं जात आहे.

2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने इतिहास रचलाय. भारताने दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलंय. अंतिम फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. याआधी टीम इंडियाने 2007 चा टी-20 विश्वचषकही जिंकला होता. तर 1983 आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकलाय.

वर्ल्डकप विजेत्या संघासाठी 125 कोटींचे बक्षीस जाहीर

भारतीय खेळाडूंनी टी-२० वर्ल्डकपच्या ट्रॉफी जिंकल्यानंतर बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.  वर्ल्डकपविजेत्या संघावर बक्षिसांचा वर्षाव केलाय. भारतीय संघाला बीसीसीआयकडून बक्षीस म्हणून १२५ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

या T20 विश्वचषकातील संघ

रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या. सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Rain : मुंबईत पावसाचा हाहाकार, अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी, लोकल ३० मिनिटे उशिराने

Maharashtra Rain Live News: गडचिरोली जिल्ह्यातील 100 गावाचा संपर्क तुटला

कोकणात भाजपची ताकद वाढली; सावंतवाडीत केसकरांच्या विरोधात ठोकला होता शड्डू, शिवसेनेला धक्का

Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न स्टेट्स कसं चेक करायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Ride Accident Viral Video: 50 फूटावरून राईड कोसळली; सोमनाथ मंदिराच्या यात्रेत मोठा अपघात; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT