Rohit Sharma Barbados VIDEO: T20 चॅम्पियन झाल्यानंतर रोहितने पिचवरची माती का खाल्ली?

Rohit Sharma on India's T20 World Cup win, grass-eating celebration: टी २० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा जेव्हा कर्णधार म्हणून फोटोशूटसाठी आला तेव्हा त्याने माती खाल्ली होती. त्या फोटोवरुन खूप चर्चा रंगलीय. बीसीसीआयने हा व्हिडिओ शेअर केलाय.
Rohit Sharma Barbados VIDEO: T20 चॅम्पियन झाल्यानंतर रोहितने पिचवरची माती का खाल्ली?
Rohit Sharma on India's T20 World Cup winx
Published On

T20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने कप विजेता कर्णधार म्हणून फोटोशूट केलं. हे फोटोशूट बार्बाडोसच्या समुद्रकिनाऱ्यावर झालं. त्यावेळी त्याने विश्वकप एखाद्या लहान बाळाप्रमाणे हातात घेतले होते. बीसीसीआयने व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये हिटमॅन रोहित शर्मा बार्बाडोसमधील किंग्स्टन ओव्हल मैदानावरील पिचची माती खाल्ली. त्याने असं का केलं, यावर खूप चर्चा झाल्या. या चर्चांनंतर खुद्द रोहित शर्माने उत्तर दिलंय.

फोटोशूट करताना रोहित शर्माच्या चेहऱ्यावरुन हसू काही केल्या जात नव्हतं. त्यामागे कारण ही तसेच आहे, भारताने तब्बल १३ वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकलाय. दरम्यान काही वेळानंतर रोहितने माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणाला, हे सर्व अवास्तव वाटतं. स्वप्नासारखे वाटतं. जणू काही घडलंच नाही. हे सर्व झाले असले तरी तसे झालेच नाही असे वाटतं. याच दरम्यान रोहितने विम्बल्डन जिंकल्यानंतर नोव्हाक जोकोविचप्रमाणेच मैदानाची माती चाखली. रोहित शर्माने केन्सिंग्टन ओव्हलच्या खेळपट्टीवर गेला आणि तेथील पिचची माती खाल्ली, त्याने असं का केलं याचं कारण खुद्द कर्णधार रोहित शर्माने सांगितलं.

स्क्रिप्टनुसार काहीही झाले नाही. हे सर्व नैसर्गिकरित्या घडत होते. तो क्षण मला जाणवत होता. जेव्हा मी खेळपट्टीवर गेलो, त्या खेळपट्टीवर ज्याने आम्हाला ही ट्रॉफी दिली. मला ते मैदान आणि ती खेळपट्टी माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. मला खेळपट्टीचा एक कण एक तुकडा माझ्याकडे ठेवायचा होता. ते क्षण खूप खास आहेत, जिथे आमची सर्व स्वप्ने साकार झाली आणि मला त्याचा एक भाग हवा होता.’, असं रोहित म्हणाला.

पुढे बोलताना रोहित म्हणाला, सामना झाल्यानंतरची रात्र आम्ही खूप पद्धतीने घालवली. सकाळी पहाटेपर्यंत आम्ही आमच्या सहकाऱ्यांसोबत खूप मजा केली.’ त्यावेळी रोहित स्वतःला हसण्यापासून रोखू शकला नाही. त्यानंतर तो थोडा भावूक झाला. 'मी नीट झोपू शकलो नाही असे म्हणेन, पण मला काही फरक पडत नाही. माझ्याकडे परत झोपायला भरपूर वेळ आहे. मला हा क्षण प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद जगायचा आहे आणि मी त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेन. ११ वर्षांनंतर प्रथमच ICC विजेतेपद जिंकण्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व करताना कसे वाटले? असं प्रश्न त्याला करण्यात आला तेव्हा रोहित म्हणाला, 'सामना संपल्यापासून आत्तापर्यंत हा एक अद्भुत क्षण होता.

Rohit Sharma Barbados VIDEO: T20 चॅम्पियन झाल्यानंतर रोहितने पिचवरची माती का खाल्ली?
Rohit Sharma: जिकडे तिकडे हिटमॅनची हवा! लोकप्रिय खेळाडूंमध्ये रोहित नंबर 1

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com