Rohit Sharma Strategy: रोहित शर्माच्या डोक्यात नेमकं काय सुरूये? सराव सामन्यात घेतले २ आश्चर्यचकित करणारे निर्णय

India vs Bangladesh, Warm Up Match: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात रोहित शर्माने २ आश्चर्यचकित करणारे निर्णय घेतले.
Rohit Sharma Strategy: रोहित शर्माच्या डोक्यात नेमकं काय सुरूये? सराव सामन्यात घेतले २ आश्चर्यचकित करणारे निर्णय
team indiatwitter

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. सराव सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर ६० धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ केला. मात्र कर्णधार रोहित शर्माने घेतलेल्या २ निर्णयांनी सर्वांनाच अचंबित केलं. त्यामुळे रोहित शर्माच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

युजवेंद्र चहलला एकही षटक टाकू दिलं नाही

युजवेंद्र चहल हा टी -२० क्रिकेटमध्ये भारतीय संघातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. बांगलादेशविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात एकूण ८ गोलंदाजांनी गोलंदाजी केली. ज्यात जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांचा समावेश होता. मात्र युजवेंद्र चहलला एकही षटक टाकण्याची संधी मिळाली नाही. चहलला गोलंदाजी का करू दिली नाही? याचं उत्तर स्वतः रोहित शर्माच देऊ शकतो.

Rohit Sharma Strategy: रोहित शर्माच्या डोक्यात नेमकं काय सुरूये? सराव सामन्यात घेतले २ आश्चर्यचकित करणारे निर्णय
IPL 2025 Mega Auction: मेगा ऑक्शनमध्ये किती खेळाडूंना रिटेन करता येणार? फ्रेंचाईजींचं टेन्शन वाढलं!

संजू सॅमसनसोबत डावाची सुरुवात

टी -२० वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी असं म्हटलं जात होतं, की रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करतील. मात्र सराव सामन्यात वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे. बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित शर्मासोबत संजू सॅमसनने डावाची सुरुवात केली. त्यामुळे यशस्वीऐवजी संजू सॅमसनच डावाची सुरुवात करणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

Rohit Sharma Strategy: रोहित शर्माच्या डोक्यात नेमकं काय सुरूये? सराव सामन्यात घेतले २ आश्चर्यचकित करणारे निर्णय
IND vs BAN, Warm Up Match: पहिला पेपर पास! टीम इंडियाचा बांगलादेशवर दणदणीत विजय

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय संघाकडून रिषभ पंतने ५३ धावांची खेळी केली. तर हार्दिक पंड्याने नाबाद ४० धावा केल्या. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटक अखेर ५ गडी बाद १८२ धावा स्कोअरबोर्डवर लावल्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला ९ गडी बाद अवघ्या १२२ धावा करता आल्या. यासह भारतीय संघाने हा सामना ६० धावांनी आपल्या नावावर केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com