आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहली अमेरिकेत दाखल झाला आहे. दरम्यान अमेरिकेत दाखल होताच त्याला आयसीसीच्या मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
टी -२० वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीला आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इतर २०२३ चा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. २०१९ नंतर विराट कोहलीच्या फॉर्ममध्ये घसरण झाली होती. २०२३ हे वर्ष त्याच्यासाठी शानदार राहिलं. वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत त्याच्या फलंदाजीची जादू पाहायला मिळाली. या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. शनिवारी आयसीसीने विराटला, आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर २०२३ ची कॅप आणि ट्रॉफी देत असल्याचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
विराट कोहलीची बॅट २०२३ मध्ये चांगलीच तळपली. त्याने या वर्षात २७ सामने खेळले. यादरम्यान त्याने ७२.४७ च्या सरासरीने १३७७ धावा केल्या. यादरम्यान त्याने ८ अर्धशतकं आणि ६ शतकं झळकावली. १६६ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. याच वर्षी भारतीय संघाने आशिया चषकावर नाव कोरलं. ही स्पर्धा जिंकून देण्यातही विराटने मोलाची भूमिका बजावली.
वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाने फायनलमध्ये धडक दिली. मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेत फलंदाजी करताना विराटने विक्रमी ७६५ धावा केल्या. यासह त्याने सचिनचा एकाच वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक (६७३) धावा करण्याचा रेकॉर्ड मोडून काढला. याच स्पर्धेत त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतीतलं ५० वं शतक ओपूर्न केलं आणि सचिनचा सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड मोडून काढला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.